शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

परमार्थ साधण्यासाठी अभिनव आटा व रोटी बँक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 01:02 IST

कोरोनाच्या या महासंकट काळात ज्या नागरिकांना परिस्थितीअभावी इतरांना काही मदत करणे शक्य हाेत नाही, त्यांनादेखील सामाजिक कार्यासाठी योगदान देता यावे, या उद्देशाने नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोटी बँक हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या रोटी बँक उपक्रमात समाजासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना घरपोच ५ किलो आटा दिला जातो. त्यातून निम्मा आटा त्यांनी स्वत:च्या कुटुंबासाठी ठेवून उर्वरीत आट्याच्या पोळ्या बनवून दिल्यास त्या गरजूंपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी रोटी बँकच्या सामजिक कार्यकर्त्यांकडून पार पाडली जाते.

ठळक मुद्देकोरोना संकटग्रस्तांना मदत

नाशिक : कोरोनाच्या या महासंकट काळात ज्या नागरिकांना परिस्थितीअभावी इतरांना काही मदत करणे शक्य हाेत नाही, त्यांनादेखील सामाजिक कार्यासाठी योगदान देता यावे, या उद्देशाने नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोटी बँक हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या रोटी बँक उपक्रमात समाजासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना घरपोच ५ किलो आटा दिला जातो. त्यातून निम्मा आटा त्यांनी स्वत:च्या कुटुंबासाठी ठेवून उर्वरीत आट्याच्या पोळ्या बनवून दिल्यास त्या गरजूंपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी रोटी बँकच्या सामजिक कार्यकर्त्यांकडून पार पाडली जाते.नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या अभिनव रोटी बँकेच्या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. यात प्राचार्य प्रशांत पाटील, विजय बाविस्कर, कैलास पाटील, हेमंत राठी, हेमंत धात्रक, उमेश राठी, दिलीप भामरे, सचिन जोशी, संजय लोंढे, अजित पाटील, अरविंद महापात्रा, डॉ. राजेंद्र नेहते, डॉ. अनिता नेहते, डॉ. भरत केळकर, डॉ. राजेंद्र कलाल, डॉ. उल्हास कुटे, नानासाहेब सोनवणे, मिलिंद जाधव, समीर रकटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. कोविडमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. तर हजारो कुटुंबांतील कर्त्या नागरिकांना महिना, दोन महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत किंवा पगारात मोठी कपात होत असल्याने त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अशा नागरिकांनादेखील समाजासाठी काही योगदान देण्याची इच्छा असते. मात्र, परिस्थितीअभावी त्यांना तसे शक्य हाेत नाही. अशा कुटुंबियांनादेखील मदत होऊ शकेल, तसेच त्यांना समाजासाठी काही याेगदान दिल्याचेही समाधान लाभू शकेल, असा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न रोटी बँकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.  या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ९५४५४५३२३३ या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना ५ किलो आटा अर्थात गव्हाचे पीठ घरपोच दिले जाते. त्यातून निम्म्या पिठाचा त्यांनी कुटुंबासाठी वापर करुन उर्वरीत पिठाच्या शक्य तेवढ्या रोट्या करुन त्या गृह अलगीकरणामध्ये असलेल्या बाधित गरजूंना किंवा गरजूंना मोफत द्याव्यात, अशी रोटी बँकेमागील संकल्पना आहे.  

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिकcorona virusकोरोना वायरस बातम्या