शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

आततायीपणामुळेच निष्पाप जिवांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:18 IST

लोहोणेर : कोरोनामुळे आलेले बंदिस्त जीवन, शाळा- महाविद्यालये बंद, पर्यटन ठप्प यामुळे खास करून युवा वर्ग वैतागून गेला आहे. मग दोन-चार मित्र एकत्र येत कुठेतरी जवळपास निसर्गसानिध्यात जाण्याचा बेत ठरवतात... तिथे पाण्याचा स्रोत असेल तर मग पोहोण्याचे आकर्षण...पाण्याचा अंदाज नाही..नीटसे पोहता येत नाही.. मग यातून काहीतरी अघटित घडते. गेल्या महिन्याभरात एकापाठोपाठ झालेल्या पाण्यात बुडून मृत्यूच्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देपूर्वसूचना देणाऱ्या फलकांची गरज : बुडून मृत्यूच्या घटनांत होतेय वाढ

लोहोणेर : कोरोनामुळे आलेले बंदिस्त जीवन, शाळा- महाविद्यालये बंद, पर्यटन ठप्प यामुळे खास करून युवा वर्ग वैतागून गेला आहे. मग दोन-चार मित्र एकत्र येत कुठेतरी जवळपास निसर्गसानिध्यात जाण्याचा बेत ठरवतात... तिथे पाण्याचा स्रोत असेल तर मग पोहोण्याचे आकर्षण...पाण्याचा अंदाज नाही..नीटसे पोहता येत नाही.. मग यातून काहीतरी अघटित घडते. गेल्या महिन्याभरात एकापाठोपाठ झालेल्या पाण्यात बुडून मृत्यूच्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाची महामारी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणतेही कार्यक्रम नाहीत, मोठे लग्न समारंभ नाहीत, सण-उत्सव-यात्रा नाहीत. बाहेर कुठे फिरायला जावे म्हणावे तर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती.. टीव्ही-मोबाइलचाही कंटाळा आलाय..फारसा कामधंदा नाही..यामुळे युवावर्ग घरात थांबण्यापेक्षा जवळपास कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु या नैसर्गिक वातावरणात यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे छोटी-मोठी धरणे, तलाव, तळी, नदीतील डोह, विहिरी सध्या मृत्यूचे सापळे ठरत आहेत. खरे तर शेतीसाठी पाण्याचे हे स्रोत गरजेचे आहेत पण मुलांच्या आततायीपणामुळे ते जीवघेणे ठरत आहेत. देवळा तालुक्यात गेल्या महिन्याभरात अशा चार व इतर तालुक्यांत अशा अनेक घटना घडल्याने यावर सारासार विचार करण्याची वेळ आली आहे.ज्या ठिकाणी अशी धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची जास्त शक्यता आहे किंवा यापूर्वी तशा घटना घडल्या आहेत. तिथे सावधगिरीचे फलक लावण्याची गरज आहे. यामुळे भविष्यात अशा घटना, धोके टळू शकतात. प्रत्येक आठवड्याला जिल्हाभरात बुडून मरणाऱ्यांची घटना काहीतरी सांगून जात असली तरी बोध घ्यायला कुणीच तयार होत नाही. पोहायला येत नसतांनाही पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते हे माहीत असूनही मित्रांच्या आग्रहाखातर हकनाक मरणाच्या दारात पोचणाऱ्यांची संख्या कमी नाही. बैलपोळा, गणेशमूर्ती विसर्जन, सहल अशा पार्श्वभूमीवर कितीतरी जीव बळी पडतात. नशीब बलवत्तर असले तर वेळेवर मदत मिळून जीवदान मिळू शकते, नाहीतर ते चार-पाच मिनिटं जीवनरेषा पुसण्यास पुरेसे ठरतात. या मृत्यूच्या सापळ्यात कोण केव्हा अडकेल हे सांगणे कठीण असले तरी सावधगिरीचा उपाय म्हणून तेथे पूर्वसूचना देणाऱ्या पाट्या व फलक लावण्याची खरी गरज आहे.चोरचावडी (दहीवड ता.देवळा) येथील धबधब्यात दोन युवकांचा बुडून मृत्यू, वाखारी (ता.देवळा) येथील विहिरीच्या पाण्यात बुडून सैनिकाचा शेवट, रामेश्वर धरणावरील घटना, कळवणजवळ गिरणा नदीपात्रात बुडून मुलाचा मृत्यू, मालेगावजवळ गिरणा नदीत बुडणाऱ्याची वाढती संख्या.. अशा कितीतरी घटना पाहता याबाबत विचार करण्याची गरज आहे ---- जितेंद्र आहेर, विरोधी पक्षनेते, देवळा नगरपंचायतधबधबा असो की कोणतेही धरण-तलाव असो ...अशा ठिकाणी जागृतीपर फलक लावून धोक्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबत दखल घेतल्यास पुढील काळात अशा दुर्घटना घडणार नाहीत.- भारत कोठावदे, देवळा

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस