शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमधील विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या अव्वल खेळाडूंवर अन्याय !

By धनंजय रिसोडकर | Updated: October 19, 2023 16:12 IST

जळगावला १७ वर्षांखालील वयोगटातील विशेष म्हणजे या स्पर्धेत नाशिक विभागातील अधिकृत पंच नसल्याने स्थानिक पंचांकडून मल्लखांबपटूंच्या संच सादरीकरणाला गुण देण्यात आले होते.

धनंजय रिसोडकर  / नाशिकनाशिक : जळगावातील एम. जे. कॉलेजमध्ये झालेल्या शालेय विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिक शहरातून गेलेल्या आणि स्पर्धेत सर्वोत्तम सादरीकरण करून अधिक गुण मिळालेल्या खेळाडूंना डावलून अनधिकृत पंचांच्या नात्यागोत्यातील खेळाडूंना प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे प्रदान करण्यात आली. तर ज्यांनी सर्वोत्तम सेटचे सादरीकरण केले, त्यांना स्पर्धेबाहेर काढण्यात आले. त्याबद्दल जळगावच्या क्रीडा अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवत तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याने जिल्हा मल्लखांब असोसिएशनसह मल्लखांबपटूंसह पालकांनी नाशिकच्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांसह, क्रीडा सचिव आणि थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदवत दाद मागण्यात आली आहे.

जळगावला १७ वर्षांखालील वयोगटातील विशेष म्हणजे या स्पर्धेत नाशिक विभागातील अधिकृत पंच नसल्याने स्थानिक पंचांकडून मल्लखांबपटूंच्या संच सादरीकरणाला गुण देण्यात आले होते. या बाबतीत नियमानुसार रक्ताच्या नात्यातील खेळाडू खेळत असल्यास तिथे संबंधित पंचाला पंच म्हणून कर्तव्य करण्याची परवानगी नसते. मात्र, जळगावच्या स्पर्धेत पंचाच्या नात्यातील खेळाडूंना खेळवून तसेच त्यांचे सादरीकरण अत्यंत सर्वसाधारण असल्याने कमी गुण मिळाले असतानाही त्यांना विजयी घोषित करण्याची कामगिरी करण्यात आली. गत काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत असल्यानेच नाशिक जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह पालकांकडून याप्रकरणी आक्रमक भूमिका स्वीकारत क्रीडा विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांसह थेट पंतप्रधान कार्यालयाकडेच त्याबाबत दाद मागण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक