शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र महाराजांकडून साधकांना दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:53 IST

मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही.

पंचवटी : मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही. संसारात सुख निर्माण व्हावे यासाठी आध्यात्मात आले पाहिजे. ज्याला अध्यात्म शिकायचे आहे त्याने साधक दीक्षा घ्यावी, असे मत अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन करताना केले.आशेवाडी जवळील जनम संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ आश्रमात अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे समस्या मार्गदर्शन आणि प्रवचन दर्शन सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.साधक दीक्षेचे महत्त्व सांगताना ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी भक्तांनी साधक दीक्षा घ्यावी. विज्ञान आणि ज्ञान यांची सांगड साधक दीक्षेत घातली जाते. त्यामुळे जीवन हे सुखकर होते. पुण्य वाढले की मोक्ष मिळतो असा आपला समज आहे. त्या कारणाने प्रत्येक जण पुण्य मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पुण्य समजून घेण्यासाठी भक्तांनी साधक दीक्षा घ्यावी. साधक दीक्षा घेतल्यानंतर साधकाने काही पथ्य पाळावयाची आहेत. त्यात त्यांनी कोणालाही फसवायचे नाही, व्यसन करायचे नाही, खोटे बोलायचे नाही, मनातही कोणाबद्दल वाईट चिंतायचे पाहिजे नाही, असे ते शेवटी म्हणाले.नाशिक जिल्ह्यासह नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर तसेच इतर जिल्ह्यातून भक्तांनी दर्शनासाठी तसेच समस्येवर मार्गदर्शन मिळावे यासाठी गर्दी केली होती. यावेळी ३१५ नवीन साधकांना स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांनी साधक दीक्षा दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक