शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मेअखेरपर्यंत माहिती पुस्तिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:15 IST

आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लांबल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही रखडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून, माहिती पुस्तिकेच्या छपाईचे काम सुरू झाल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिकांचे वाटप होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेशप्रक्रिया : टंकलेखन पूर्ण, मुद्रितशोधनाचे काम सुरू

नाशिक : आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लांबल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही रखडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून, माहिती पुस्तिकेच्या छपाईचे काम सुरू झाल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिकांचे वाटप होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.नाशिक महापालिका परिसरात गेल्या वर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी २० एप्रिलपासून आॅनलाइन प्रक्रियेस सुरुवात झाली होती, तर १० मेपासून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांचे वितरण सुरू झाले होते. यंदा मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू होऊनही आॅनलाइन प्रक्रियेस अद्याप सुरुवात झालेली नसल्याने दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थी आणि पालकांना अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेची प्रतीक्षा लागली आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ९ मे रोजी रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली असली तरी अद्याप माहिती पुस्तिकेची प्रत्यक्ष छपाई सुरू झालेली नाही. आतापर्यंत केवळ टंकलेखन झाले असून, मुद्रितशोधनाची प्रक्रिया सुरू आहे. मुद्रितशोधन पूर्ण झाल्यावर तत्काळ सर्व पुस्तिकांची छपाई सुरू होणार असून, मे महिन्यांच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तिका पडतील, असा विश्वास नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केला आहे.विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजीगेल्यावर्षी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरून घेण्यात आला होता. शहरातील विविध शाळांना ४ मे रोजीच माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले होते, तर १० मेपासूून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांची विक्री सुरू झाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी निकालापूर्वी प्रक्रियेतील पहिला टप्पा पूर्ण करून निकालानंतर दुसरा भाग भरला होता. असे असतानाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुमारे १२ आॅक्टोबरपर्यंत सुरू होती. त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परीक्षेसाठी तयारी करता आली नाही. त्या पार्श्वभूमीवर यंदा प्रवेशप्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा असताना अद्यापही प्रवेशप्रक्रियेचे निश्चित वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी उमटत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालयEducationशिक्षण