शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:13 IST

मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जात आहे. सातत्याच्या दुष्काळानंतर यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फवारणी करून कांदा पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ठळक मुद्देमालेगाव । शेतकऱ्यांकडून महागड्या औषधांची फवारणी; खर्चात वाढ

वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जात आहे. सातत्याच्या दुष्काळानंतर यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फवारणी करून कांदा पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असताना विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकºयांनी सांगितले आहे. वडनेरसह काटवण परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू आहे. अवघ्या तीन ते चार महिन्यात पीक हाती येत असल्याने हुकमी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. परंतु अधूनमधून बदलणाºया वातावरणामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव असल्याने सगळेच शेतकरी कांदा लागवडीकडे वळला आहे. मध्येच मोठ्या प्रमाणात रोपाचा तुटवडा जाणवला. अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे कांदा रोपे खराब झाली होती. यामुळे शेतकºयांनी रोपे विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला. तालुक्यात अद्यापही कांदा लागवड सुरू आहे. यातच निसर्गाचा लहरीपणा बदलते हवामान अडचणीत आणणारे ठरत आहे.सुरुवातीपासून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली; परंतु काही दिवसांपासून बदललेले वातावरण यामुळे नवीन जोमात आलेल्या कांदा पिकावर मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेंडा वळणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. मालेगाव तालुक्यातील सावतावाडी, वडनेर परिसरात करपा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सातत्याच्या दुष्काळाचा सामना केल्यानंतर यंदा चांगले पर्जन्यमान तसेच कांद्याला चांगला दर मिळत असल्याने ‘अच्छे दिन’ची आशा बाळगत शेतकºयांनी कांदा लागवडीवर भर दिला आहे. यातच रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत आणणारा ठरत आहे. कृषी विभागाने शेतकºयांना करपा रोगावर उपाययोजना करण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.कांदा लागवडीत झाली वाढयंदा कांद्याला विक्रमी दर मिळाल्यामुळे कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात आहे. एकर हुकमी नगदी पीक समजल्या जाणाºया कांद्याचे कसमादे हे माहेरघर आहे. मालेगाव तालुक्यातील माळमाथा व काटवन भागात कपाशी हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र यंदा पाऊस समाधानकारक झाल्यामुळे नदी-नाले वाहत आहेत. तर विहिरींच्या जलपातळीत कमालीची वाढ झाली आहे. कोरडवाहू क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जात आहे. आगामी काळात कांद्याला दर मिळेल, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकºयांकडून केली जात आहे. महागडे ओळ्या आणून कांद्याची लागवड केली जात आहे. मात्र बदलत्या वातावरणाचा कांदा पिकावर परिणाम जाणवू लागला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा