शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाला बंडखोरीची लागण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 19:39 IST

नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत सेनेने दहा व भाजपाने पाच जागा वाटून घेत अपवाद वगळता उमेदवारांच्या नावांची घोषणाही झाली असून, दोन्ही पक्षांनी आपल्या मागच्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल, या अपेक्षेने गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात पक्ष

ठळक मुद्देस्वकीयांबरोबरच मित्रपक्षांचे आव्हान : विरोधी पक्षांचे फावलेस्वकीय नगरसेवक दिनकर पाटील यांनीदेखील अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा व सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, प्रत्येक मतदारसंघात नाराजीचा सूर उमटू लागला असून, अपेक्षेनुसार तिकीट वाटप न झाल्याचा मुद्दा पुढे करून इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारले आहे. स्वपक्षीय उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांमध्ये भाजपाच्या इच्छुकांबरोबरच मित्रपक्ष शिवसेनेच्याही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्षांमधील या बंडखोरीचा लाभ विरोधी पक्षांना झाला असून, नाराज झालेल्यांनी पक्षांतर करून ऐनवेळी उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे.

नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत सेनेने दहा व भाजपाने पाच जागा वाटून घेत अपवाद वगळता उमेदवारांच्या नावांची घोषणाही झाली असून, दोन्ही पक्षांनी आपल्या मागच्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल, या अपेक्षेने गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात पक्ष संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कामे केलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. भाजपाच्या ताब्यात असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघावर यंदा सेनेने दावा सांगून गेल्या काही महिन्यांपासून सेनेच्या नगरसेवकांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात होती. परंतु जागा भाजपाला व विद्यमान आमदार सीमा हिरे यांनाच उमेदवारी दिल्यामुळे सेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे, तर दुसरे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सिडकोतील सर्व सेनेच्या नगरसेवकांची बैठक बोलावून निवडणुकीत भाजपाचा प्रचार न करण्याचे संकेत दिले आहेत. सेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी जागा भाजपाला सुटणार असल्याचे गृहीत धरून दोन दिवसांपूर्वीच मनसेची वाट धरून उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे. मित्रपक्षांकडून भाजपासमोर अडचणी उभ्या केल्या जात असताना स्वकीय नगरसेवक दिनकर पाटील यांनीदेखील समर्थकांचा मेळावा घेऊन अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देवळाली मतदारसंघ सेनेला सोडल्यामुळे नाराज झालेल्या भाजपाच्या नगरसेवक सरोज आहेर यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली तरी चालेल, परंतु निवडणूक लढविण्याचा त्यांनी इरादा बोलून दाखविला आहे. इगतपुरी मतदारसंघातून कॉँग्रेसमधून सेनेत प्रवेश केलेल्या निर्मला गावित यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनीही समर्थकांची जमवाजमव सुरू केली आहे. नांदगाव मतदारसंघ सेनेला सुटल्यामुळे भाजपाच्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. तर दिंडोरी मतदारसंघातून सेनेने माजी आमदार धनराज महाले यांना तिकीट दिल्यामुळे उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने सेनेत प्रवेश केलेले माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही अपक्ष लढविण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे, तर जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांनीही पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. कळवण मतदारसंघ सेनेला सुटल्याने भाजपाचे इच्छुक एन. डी. गावित यांनी नाराजी बोलून दाखविली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकNashikनाशिक