शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

बागलाण तालुक्यातील ५० गावात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 15:22 IST

वटार : सटाणा शरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनानाचे शिरकाव केला असून तालुक्यातील सटाणासह ५० गावात कोरोनानाने शिरकाव केला. तालुक्यातील ७५६ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर १७ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला असून, आॅगस्ट सप्टेंबरमध्ये कोरोनाचा विस्पोट झाला असून गेल्या ४० दिवसात ५६४ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

ठळक मुद्दे७५६ बाधित रु ग्ण तर १७ मृत्य ; आॅगस्ट सप्टेंबरमध्ये कोरोनाचा रुग्णामध्ये वाढ.

वटार : सटाणा शरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनानाचे शिरकाव केला असून तालुक्यातील सटाणासह ५० गावात कोरोनानाने शिरकाव केला. तालुक्यातील ७५६ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर १७ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला असून, आॅगस्ट सप्टेंबरमध्ये कोरोनाचा विस्पोट झाला असून गेल्या ४० दिवसात ५६४ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढतच असून, सटाणा शहरासह तालुक्यातील जायखेडा, नामपूर, लखमापूर, ताहाराबाद, मुल्हेर, डांगसौंदाणे सारख्या मोठ्या बाजारपेठेच्या गावात सर्वाधिक कोरोना बाधित रु ग्ण सापडल्यामुळे त्याचा परिणाम आजूबाजूच्या गावांमध्ये देखील पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.तालुक्यातील बाधित रु ग्णांचे अजमेर सौदाणे व डांगसौंदाणे येथील कोविडे केअर सेंटर व उपचार सुरु असून तेथे आरोग्य विभागाच्या टीमने रु ग्णांची पुरेपूर काळजी घेत उपचार करून रु गाणना, मानसिक आधारही दिला जात आहे. तेथे आज २२६ रु गानांवर उपचार सुरु करून ५१३ रु ग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतले आहेत.तालुक्यातील आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतत मार्गदर्शन केले जात आहे. दरम्यान ज्या गावात बाधित रु ग्ण सापडतो त्या गावात दोन-चार दिवस कडकडीत बंद व सुरक्षेच्या नियमांचे कोटेकोर पालन केले जाते. त्यानंतर मात्र सर्व नियम ग्रामीण भागात मोडीत काढले जातात.

आकडेवारी....एकूण बधितांची संख्या ७५६तालुक्यातील कंटेनमेंट झोन ७१तालुक्यातील कंटेनमेंट अ‍ॅक्टीव झोन ४९सर्वेक्षणासाठीचे कर्मचारी ३३४सर्वेक्षण केलेली घरे ९४८७तपासलेले नागरिक ४८९६९पूर्णपणे बरे झालेले ५१३उपचार घेत असलेले २२६घेतलेले एकून स्वब २१९७एकूण आलेले निगेटिव्ह १४४१बाधित पुरु ष ४६५बाधित महिला २९१बाधित बालके १०बाधित बालिका ६मे महिन्यातील बधितांची संख्या ८जून - बधितांची संख्या ७०जुलै - बधितांची सांख्या ११४आॅगस्ट - बधितांची सांख्या ४०४सप्टेंबर - बाधितांची संख्या १६०तालुक्यातील नागरिकांना सोशल डीस्टनसिंग,मास्कचा वापर करावा, लहान बालके, वयोवृद्ध नागरिकांची विशेषकरून काळजी घ्यावी तसेच बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांना गावाबाहेर १४ दिवस कॉरनटाइन करावे तसेच आपल्या गावात शेजारी जर कोणी बधितल आढळून आला तर शेजारी किंवा संपर्कातील नागरिकांनी कोणतीही माहिती लपवू नये व स्वत:हून आपली चेकिंग करून घ्या म्हणजे आपल्याल्या लवकरात लवकर कोरोनाची साखळी तोडता येईल, ज्या नागरिकांना डायबेटीस, हायपररटेन्शन आहे, आणि ६० वर्षापेक्षा वयजास्त आहेत. त्यांनीतर घराबाहेर पडूच नये व स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करावा.- हेमंत आहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी बागलाण.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या