शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:50 IST

दिंडोरी/जानोरी : परिसरात पिकांवर गोगल गायीचा प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण झाला आहे.अनेक प्रकारचे उपाय करूनही गोगलगायचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकऱ्यांना नर्सर्रीतील महागड्या रोपांची सांधणी करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देदिंडोरी : शेतकरी महागड्या रोपाची सांधणी करून हवालदिल

दिंडोरी/जानोरी : परिसरात पिकांवर गोगल गायीचा प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण झाला आहे.अनेक प्रकारचे उपाय करूनही गोगलगायचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकऱ्यांना नर्सर्रीतील महागड्या रोपांची सांधणी करण्याची वेळ आली आहे. सध्या पावसाचे वातावरण चांगले असल्याने शेतकरी आपल्या शेतात लागवड करताना मग्न आहे. प्रत्येक शेतकरी आपापल्या शेतात अनेक पिकांची लागवड करीत आहे. त्यात टोमॅटो , वांगे, गिलके , फ्लॉवरस, शिमला मिरची, भोपळा कोबी, तसेच झेंडू अशा अनेक प्रकारांची शेतकरी लागवड करीत आहे. परंतु जानोरी परिसरात गोगलगायीने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या अनेक प्रकारच्या पिकांच्या रोपांची नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाला आहे. गोगलगाय रात्रीच्या वेळेस जास्त नुकसान करतात व दिवसा लपून बसतात, त्यामुळे शेतकºयांना गोगलगायींचा नायनाट करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. शेतकºयांनी अनेक प्रकारचे उपाय करूनही गोगल गाईंचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे लागवड केलेल्या शेतात पुन्हा नर्सर्रीतून महागडे रोपे आणून सांधण्याची वेळ येत आहे. शेतकºयांनी प्रादुर्भाव टाळण्यासाठी केलेले उपायस्नेहकिल्ल औषध टाकणे, दुकानातली मिस्त्री झाडांच्या रोपांजवळ टाकने, खायची तंबाखू शेतात टाकने, भेळ मधील मुरमुरेना विषारी औषध लावून शेतात टाकणे,शेतातील गोगलगाई एकत्र गोळा करून मारून टाकणे.मी माझ्या शेतात झेंडूची लागवड केलेली आहे. लागवड करून दहा ते पंधरा दिवस झाले असून माझ्या शेतातील झेंडूच्या रोपांची गोगल गायने अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गोगलगायीला मारण्यासाठी मी अनेक प्रकारचे उपाय केले आहे. परंतु गोगलगायीचे प्रमाण कमी होत नसल्याने शेताचे नुकसान झाले आहे. अनेक वेळा नर्सर्रीतून झेंडूची रोपे विकत आणून सांधण्याचे काम करत आहे.-विलास काठे, शेतकरी, जानोरी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी