सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध साथींच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ग्रामीण भागातही डेंग्यू, चिकुनगुनियासारखे रुग्ण आढळून आले आहे. कोरोना महामारी आजार कुठेतरी आवाक्यात येत असून त्यातून जनता कशीबशी सावरत असताना तोच नवनवीन आजार उद्भवू लागल्याने नागरिकांच्या चिंतेत पुन्हा भर पडल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
----------------
सप्तशृंगगडावर गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस सुरू आहे. संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने सर्व गावांत प्रतिबंधात्मक धुरळणी करून डासांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणावा.
- तेजस बेनके, सामाजिक कार्यकर्ते, सप्तशृंगगड