ओझरटाऊनशिप : ओझर परिसरात बुधवारी (दि.३१) ६४ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने ओझर परिसरातील आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या १८३९ झाली आहे. पैकी ३६ जणांचा म्रुत्यू झाला असुन १४५७ रुग्ण बरे झाले आहेत.३४६ रुग्णावर उपचार सुरू असून ओझर परिसरात रोज कोरोनाचे रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहेत. त्यामुळे नागरिकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.सद्या ४८ रुग्णावर रूग्णालयात उपचार सुरू असुन २९८ रुग्ण घरीच कॉरंटाईन होऊन उपचार घेत आहेत. परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या ९०६ झाली असुन ६०४ झोन पूर्ण झाले आहेत. आता ॲक्टिव्ह झोन ३०२ आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे
ओझर परिसरात आढळले ६४ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:52 IST