शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
3
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
4
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
5
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
6
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
7
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
8
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
9
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
10
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
11
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
13
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
14
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
15
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
16
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
17
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
18
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
19
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
20
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

इंदोरे ग्रामस्थ दारूबंदीसाठी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 13:38 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील इंदोरे परिसरातील कोलेनवाडी, वासाळी फाट्याजवळील सोनारझुरी येथे अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे, गावठी दारु व ताडीचे बेकायदेशीर धंदे सर्रासपणे सुरू असून याबाबत इंदोरे येथे झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीसाठी ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील इंदोरे परिसरातील कोलेनवाडी, वासाळी फाट्याजवळील सोनारझुरी येथे अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे, गावठी दारु व ताडीचे बेकायदेशीर धंदे सर्रासपणे सुरू असून याबाबत इंदोरे येथे झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीसाठी ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी संबंधित दारु व ताडी विक्री करणाऱ्या व्यक्तीस अनेकवेळा समज देवून देखील धंदे बंद न केल्यामुळे बेकायदेशीर दारू व ताडी विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावे याबाबतचे निवेदन इंदोरे येथील सरपंच जनार्दन शेणे यांच्या नेतृत्वाखाली घोटीचे पोलिस निरीक्षक संजय कवडे यांना देण्यात आले आहे.इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या इंदोरे परिसरातील वासाळी फाट्याजवळील सोनारझुरी तसेच कोलेनवाडी येथील बेकायदेशीर सुरू असलेल्या दारु व ताडीच्या धंद्यामुळे परिसरातील पुरूष मंडळीहे दारु पिऊन परिसरात तसेच गावांमध्ये अश्लील शिवीगाळ करत असतात. यामुळे गावात नेहमीच वादविवाद होत असतात. त्यामुळे गावात व परिसरात दारूबंदी करण्यात यावी यासाठी सरपंच जनार्दन शेणे व नागरिकांनी घोटी येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय कवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सरपंच जनार्दन शेणे यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत दारुबंदी व ताडी बंदीबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर याबाबतचे निवेदन घोटी पोलिस ठाण्यात देण्यात आले . यावेळी कवडे यांनी बेकायदेशीर दारू व ताडी धंदे विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन धंदे लवकरात लवकर बंद करण्यात येतील असे आश्वासन दिले. निवेदन देतांना नथु पिचड, माजी सरपंच देवराम खतेले, माजी सरपंच जगन पावडे, नारायण खतेले, कुमार खतेले, सुनील खतेले, कान्हू जाधव, भोरू भागले, उमाकांत खाडे, अंकुश खतेले, तानाजी धादवड, विठ्ठल खतेले, अमृता खतेले, अमृता बेंडकोळी, बाळु खतेले, गंगाराम खतेले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक