इंदिरानगरवासियांना चक्री बससेवेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:09 AM2021-02-22T04:09:46+5:302021-02-22T04:09:46+5:30

सुमारे अठरा वर्षांपूर्वी नागरिकांच्या मागणीनुसार, इंदिरानगर ते शालिमार सावरकर चौक, बापू बंगला, साईनाथनगर चौफुली, विनयनगर, वडाळा नाका, मुंबई ...

Indiranagar residents waiting for Chakri bus service | इंदिरानगरवासियांना चक्री बससेवेची प्रतीक्षा

इंदिरानगरवासियांना चक्री बससेवेची प्रतीक्षा

Next

सुमारे अठरा वर्षांपूर्वी नागरिकांच्या मागणीनुसार, इंदिरानगर ते शालिमार सावरकर चौक, बापू बंगला, साईनाथनगर चौफुली, विनयनगर, वडाळा नाका, मुंबई नाका, दीपालीनगर, जॉगिंग ट्रॅक, गजानन महाराज मार्ग, चार्वाक चौक अशी चक्री बससेवा सुरू होती. त्यामुळे इंदिरानगर, साईनाथनगर, शिवाजी वाडी, वडाळा नाका, भाभानगरसह परिसरातील उपनगरातील शेकडोंच्या संख्येने शहरात शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी आणि नोकरी-व्यवसाय करणारे नागरिक सदर चक्रीबसचा लाभ घेत होते. चक्री बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असायची. त्यामुळे शहर वाहतूक बससेवेच्या महसुलातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परिसरात दिवसागणिक वाढणारे अपार्टमेंट व सोसायटीमुळे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बससेवेच्या फेऱ्या वाढविण्याऐवजी शहर वाहतूक बससेवेच्या वतीने सुमारे तेरा वर्षांपूर्वी इंदिरानगर ते शालिमार चक्री बससेवा बंद केली. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. विद्यार्थी वर्ग आणि नागरिकांना जादा पैसे मोजून रिक्षामध्ये प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून अनेकवेळेस निवेदन व समक्ष भेटून चक्री बस सुरू करण्याची मागणी केली आहे.

कोट : ज्या ठिकाणी रस्ते आणि लोकवस्ती त्या ठिकाणी बससेवा शहर वाहतूक बससेवेचे ब्रीदवाक्य नावापुरतेच आहे. अपुऱ्या बससेवेभावी विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे

- योगेश दिवे

सार्वजनिक व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येते. परंतु सार्वजनिक बस व्यवस्था अपुरी असेल तर त्याचा काय फायदा.

इंदिरानगर ते शालिमार चक्री बस सेवा सुरू केल्यास विद्यार्थी वर्ग व नोकरदारांची सोय होईल.

- अशोक लोळगे

Web Title: Indiranagar residents waiting for Chakri bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.