शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा महिन्यात इंदिरानगरला दुसरा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:33 IST

या सव्वा महिन्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी खुनाची घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. पहिली घटना भरवस्तीत ८ जानेवारी रोजी रात्री घडली होती.

इंदिरानगर : या सव्वा महिन्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी खुनाची घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. पहिली घटना भरवस्तीत ८ जानेवारी रोजी रात्री घडली होती. सहा लाखांची लूट करण्यासाठी व्यावसायिकाचा खून करण्यात आला होता. या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, पाथर्डीगावातील सुखदेवनगरमधील रितेश अनिल पाईकराव (१९) या युवकाचा कुरापत काढून मंगळवारी (दि.१९) रात्रीच्या सुमारास खून करण्यात आला. संशयित आरोपींचे काही महिन्यांपूर्वी पाईकरावसोबत भांडण झाले होते. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रितेश पाईकराव ‘बाहेर जाऊन येतो’, असे सांगून घरातून निघाला, मात्र रात्री साडेअकरा वाजले असतानाही तो पुन्हा घरी परतला नाही. त्यामुळे वडिलांसह अन्य नातेवाईक त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडले असता आरडाओरड सुरू असल्याचे व गर्दी झाल्याचे दिसले. त्या ठिकाणी रितेश याच्यावर संशयित नयन सुरेश शिंदे, नरेश नाना दोंदे, उमेश कोंडीबा आव्हाड यांसह तिघा अल्पवयीन साथीदारांनी हातात तलवार व चाकूसारखे धारदार शस्त्र घेऊन हल्ला चढविला.वडिलांसमोरच मुलावर वारपाथर्डी गावातील एका किराणा दुकानासमोर संशयित अरविंद सोनवणे हा तलवारीने रितेशवर वार करत असल्याचे मयताचे वडील अनिल यांनी बघितले. त्यांनी मुलाला वाचविण्यासाठी जावयासोबत त्या दिशेने धाव घेतली. दरम्यान, हल्लेखोर अरविंद व त्याचे सगळे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. अनिल यांनी जखमी मुलाला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखून