शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

इंदिरानगर व्यावसायिक खूनप्रकरण; भुसावळमधून एक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:04 IST

इंदिरानगर येथील व्यावसायिक हत्याप्रकरणी आणखी एका संशयिताच्या थेट भुसावळमधून गुरुवारी (दि.१७) मुसक्या आवळल्या. दरम्यान, या गुन्ह्यातील दोघा संशयितांना न्यायालयाने २५ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे.

पंचवटी : इंदिरानगर येथील व्यावसायिक हत्याप्रकरणी आणखी एका संशयिताच्या थेट भुसावळमधून गुरुवारी (दि.१७) मुसक्या आवळल्या. दरम्यान, या गुन्ह्यातील दोघा संशयितांना न्यायालयाने २५ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे.इंदिरानगरला गेल्या मंगळवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास व्यावसायिक अविनाश शिंदे यांची निर्घृण हत्या करून सुमारे सहा लाखांची जबरी लूट करण्यात आली होती. याप्रकरणी आठवडाभरानंतर गुन्हे शाखा व पंचवटी पोलिसांना संशयितांना जाळ्यात ओढण्यास यश आले आहे. गुन्हे शाखेने बुधवारी चिमा नाना पवार, सुनील रामचंद्र पवार या दोघांना बेड्या ठोकल्या.दोघे फुलेनगर पेठरोड येथील रहिवासी असल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तपासचक्रे फिरविली.गुन्ह्यातील मुख्य संशयितांपैकी एक विलास राजू मिरजकर (२६, रा.तेलंगवाडी, पेठरोड) याच्या मुसक्या आवळल्या.विलास हा गुन्हा घडल्यापासून कुटुंबीयांसह फरार झाला होता. मात्र विलास हा सातत्याने शहरे बदलत असल्याने त्याच्यापर्यंत पोहचणे कठीण होत होते. सहायक निरीक्षक रघुनाथ शेगर, सुरेश नरवडे, महेश साळुंके, संदीप काकड, विलास चारोस्कर यांनी भुसावळ गाठले. येथे नातेवाइकांच्या घरात तो दडून बसला होता. पथकाने त्यास सापळा लावून ताब्यात घेतले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी