शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

इंदिरानगरला मिठाई वाटून विजयोत्सवाचा जल्लोष

By admin | Updated: May 17, 2014 00:18 IST

इंदिरानगर : अब की बार मोदी सरकार, जय भवानी-जय शिवाजी यांसारख्या गगनभेदी गर्जना देत इंदिरानगर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी यावेळी मिठाईचे वाटप करीत महायुतीचे विजयी उमेदवार हेमंत गोडसे यांचा विजयोत्सव साजरा केला.

इंदिरानगर : अब की बार मोदी सरकार, जय भवानी-जय शिवाजी यांसारख्या गगनभेदी गर्जना देत इंदिरानगर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी यावेळी मिठाईचे वाटप करीत महायुतीचे विजयी उमेदवार हेमंत गोडसे यांचा विजयोत्सव साजरा केला. शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना मतमोजणीमध्ये सकाळपासून आघाडी मिळत गेल्याने समर्थक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दुपारी साडेबारा- एकच्या सुमारास अंतिम निकालाची प्रतीक्षा न करताच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे महानगर कक्ष व भाजपाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व ढोल-ताशांच्या गजरात मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय गायकर, राजश्री शौचे, संजय करिपुरे, संदीप गिते, प्रकाश चौधरी, मनोज पाटील, अजय महाले आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. पाथर्डी फाटा व पाथर्डी गाव येथे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख सुदान डेमसेंसह शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटप केले. नगरसेवक वंदना बिरारी, देवानंद बिरारी यांनीही प्रभागात मिठाईचे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला. वासननगर येथेही शिवसेनेतर्फे फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी राम बडगुजर, सुजय पाटील, आकाश चोर, प्रदीप खताळे, गणेश बडवे आदि उपस्थित होते.