शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला पुन्हा सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:51 IST

पोलीस ठाणे हद्दीतील वासननगर परिसरातून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

इंदिरानगर : पोलीस ठाणे हद्दीतील वासननगर परिसरातून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.गणेशोत्सवात दोन घटना घडल्यानंतर पुन्हा मंगळवारी (दि.१७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तीन पादचारी महिला जात असताना चोरट्यांनी दुचाकीवरून येत एकीच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिता शेलार (४०, रा. नंदी रेसिडेन्सी बडदेनगर) या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचे नातेवाईक सुरेखा व सुनीता यांच्यासमवेत गामणे मळा येथून पायी जात होत्या.मळ्याकडून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी शेलार यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख ३५ हजार रु पये किमतीचे सुमारे साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून समांतर रस्त्यावरून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.चोख बंदोबस्त तरीही घटनामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि.१८) शहरात येणार असल्याने मंगळवारपासूनच शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस गस्त असतानाही रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस करत एकप्रकारे पोलिसांना आव्हानच दिले. सातत्याने इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडणाºया सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलावर्गात भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी