शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील युवा पिढी राष्ट्राचा आधारवड- स्नेहलता देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 16:35 IST

राष्ट्राची प्रगती ही युवा पिढीची जबाबदारी असून भारतातील आजची युवा पिढी ही आपल्या राष्ट्राचे आधारवड आहेत. त्यामुळे त्यांनी समाजातील चांगले बघून त्याचे अनुकरण करावे आणि वाईट प्रवृत्तींपासून दूर राहून अशा प्रवृत्ती नष्ट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांनी केले

ठळक मुद्देराष्ट्राची प्रगती युवा पिढीची जबाबदारी युवा पिढीने वाईट प्रवृत्ती नष्ट कराव्यात स्नेहलता देशमुख यांचे विद्यर्थींनींना मार्गदर्शन

नाशिक :  राष्ट्राची प्रगती ही युवा पिढीची जबाबदारी असून भारतातील आजची युवा पिढी ही आपल्या राष्ट्राचे आधारवड आहेत. त्यामुळे त्यांनी समाजातील चांगले बघून त्याचे अनुकरण करावे आणि वाईट प्रवृत्तींपासून दूर राहून अशा प्रवृत्ती नष्ट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांनी केले. एसएमआरके महिला महाविद्यालयाचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (दि.२८) साजरा करण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गोखले एजुकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह व्यासपीठावर साहित्यिक संजय कळमकर, प्राचार्य राम कुलकर्णी, जयंत कुलकर्णी आदि उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना स्नेहलता देशमुख यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीने आता वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही येण्याजी गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर प्रमुख पाहूणे साहित्यिक संजय कळमकर यांनी विद्यार्थिनींना वाचनातून आपले अनुभव समृध्द करण्याचा सल्ला देतानाच पुस्तकांना आपले जिवलग मित्र बनवून चांगल्या पुस्तकाचा संग्रह करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्व सांगताना उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे आवाहन केले.दरम्यान, वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाचा वार्षिक अंक शतरूपा’ संशोधनात्मक प्रबंधांचा संग्रह ‘इम्प्रेशन्स’ तसेच महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाच्या ई-प्रोसेडींगचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रभारी प्राचार्य साधना देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. रसिका सप्रे, स्नेहा रत्नपारखी, व प्रा. निलेश रोटे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. कविता पाटील यांनी मानले. याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. डी. के. गोसावी, प्रा. बी. देवराज, उद्योजक नीलिमा पाटील,  उपप्राचार्य डॉ. कविता पाटील, डॉ. नीलम बोकील विद्यार्थिनी सभेच्या प्रमुख डॉ. कविता खोलगडे, प्रा. सुरेखा जोगी आदी उपस्थित होते. 

गुणवंतांचा गौरवशैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करणाºया विद्यार्थिनींचा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया प्राचार्य, प्राध्यापक यांनाही याप्रसंगी गौरविण्यात आले. तसेच संस्थेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय