शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वायू सेना : मेरा रंग दे बसंती चोला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:42 IST

पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्देये देश हैं वीर जवानो का..., ऐ मेरे वतन के लोगो..., या गीतांच्या धूनला ‘वन्समोअर’ही मिळाला. वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली

नाशिक : ‘ऐ मेरे वतन के लोगो...’, ‘ ये देश हैं वीर जवानो का...’, ‘जींदगी मौत ना बन जायें संभालो यारो..., अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर हिंदी गीतांची धून भारतीय वायुसेनेच्या बॅन्ड पथकाने सादर करून नाशिककरांमधील देशक्तीचे स्फु लिंग जागविले.निमित्त होते, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देवळाली येथील वायूसेना केंद्राच्या वतीने आयोजित भारतीय संरक्षण व स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजूषा आणि संगीत संध्या मैफलीचे. उंटवाडी येथील सिटी सेंटरमॉलमध्ये शनिवारी (दि.११) झालेल्या या देशभक्तीपर कार्यक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून देवळाली केंद्राचे एअर कमांडोर विशिष्ट सेवा मेडल रवी शर्मा यांच्यासह वायुदलाचे विविध लष्करी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली. यानंतर सिम्फोनी-४०, कॉर्नफ्लिड रॉक, भारतीय क्लासीकल राग बहार, जुबी डुबी, ये मेरा दिल (हिंदी मेलोडी), सुनो गौर से दुनियावालों..., अशा विविध गीतांची धून बॅन्ड पथकाच्या वादकांनी आपल्या कौशल्यपूर्ण शैलीत सादर करत उपस्थितांची मने जींकली. मैफलीचा समारोप ‘वंदे मातरम्...,’ च्या धूनने करण्यात आला. यावेळी ये देश हैं वीर जवानो का..., ऐ मेरे वतन के लोगो..., या गीतांच्या धूनला ‘वन्समोअर’ही मिळाला. उपस्थित श्रोत्यांनी मैफलीच्या समारोपप्रसंगी ‘भारत माता की जय...’ अशा घोषणा देत देशभक्तीचा जागर केला.भारतीय वायुसेनेचा जगात चौथा क्रमांक लागतो. युध्दामध्ये निर्णायक भूमिका बजावणाऱ्या वायूदलाच्या वतीने प्रथमच सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन अशा पध्दतीने देशक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम शहरात सादर करण्यात आला. सुत्रसंचालन सुजीतकुमार झा यांनी केले.प्रश्नमंजुषेचा उत्साहसंगीत मैफलीच्या प्रारंभी वायुदलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व सैन्यदलाशी संबंधित दहा ते पंधरा विविध सामान्यज्ञानावर आधारित वैकल्पिक प्रश्न उपस्थित प्रेक्षकांना विचारण्यात आले. यावेळी बहुतांश नाशिककरांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी अचूक उत्तरे देणा-या प्रेक्षकांना वायूदलाच्या वतीने ‘कॅप’, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलNashikनाशिकmusicसंगीतIndependence Dayस्वातंत्र्य दिवस