शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

भारत योग यात्रा योगोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:47 IST

देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कूल आॅफ योगाच्या भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे उत्साहात सुरुवात झाली. ‘स्वयम को जानो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित योगोत्सवातील पहिल्याच सत्रात पाचशेहून अधिक साधकांनी सहभाग नोंदवत योगनिद्रा अनुभवली.

ठळक मुद्देपहिले सत्र : पाचशेहून अधिक साधकांनी अनुभवली योगनिद्रा

नाशिक : देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कूल आॅफ योगाच्या भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे उत्साहात सुरुवात झाली. ‘स्वयम को जानो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित योगोत्सवातील पहिल्याच सत्रात पाचशेहून अधिक साधकांनी सहभाग नोंदवत योगनिद्रा अनुभवली.अनेक वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार या योग्यविद्येचा वापर कुठेही केल्याने उत्कृष्ट परतावे मिळत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती स्वामी शिवानंद सरस्वती यांनी व्याख्यानातून दिली.सत्राच्या प्रारंभी आचार्य कैवल्यानंद सरस्वती यांनी मन:शांती तसेच वैविध्यपूर्ण आसनांची माहिती देऊन प्रात्यक्षिक ांचे सादरीकरण केले. ओमकारच्या विविध छटा त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितल्या. पवनमुक्तासनाचे तीन टप्प्यात अध्ययन करून मार्गदर्शन केले. पुढे गायत्री मंत्र म्हणत तितली आसन करत त्याचे फायदे समजावून सांगितले. प्राणायामचाही अभ्यास योगाभ्यासकांकडून करून घेण्यात आला. दरम्यान, पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवारी सकाळी व संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेदरम्यान शास्त्रीय पध्दतीने योगासने, प्राणायाम, ‘स्वयम को जानो’ विषयावर प्रवचन आणि ध्यानसाधना असे कार्यक्रम होणार आहेत.असाध्य रोगांवर नियंत्रण शक्ययोगनिद्रेच्या प्रभावाने अनेक असाध्य आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी सांगितले. तसेच मानसशास्रीय आजार, निद्रानाश, तणाव, नाश आणणाऱ्या औषधांपासून मुक्ती मिळणे शक्य असून, सांधेदुखी, दमा, पेप्टिक अल्सर, कॅन्सर, हृदयरोग यासारख्या आजारांवरील संशोधनात योगनिद्रेपासून सकारात्मक परिणाम बघायला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकYogaयोग