शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भारत अब शर्मिंदा हैं : नाशिकमध्ये मुस्लीम महिलांचा कॅन्डल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:09 IST

बलात्काराच्या घटनेतील संशयित राजकीय आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी व सदर गुन्ह्यांचा खटला जलद न्यायालयात चालविला जावा, या मागणीसाठी जुने नाशिकमधील सर्वपक्षीय नगरसेवकांसह मुस्लीम महिला, तरुण, तरुणी रस्त्यावर उतरल्या.

ठळक मुद्देभाजप सरकारचा निषेध ‘वुई वॉन्ट जस्टिस’, ‘फांसी दो, फांसी दो’ मुस्लीम महिला, पुरुष व तरुणांचा लक्षणीय

नाशिक : ‘मोदी सरकार होश में आओ,’ ‘बेटी बचेगी तो पढेगी..,’ ‘ इज्जत के लुटेरे अब भी जिंदा हैं, भारत शर्मिंदा हैं’, ‘वुई वॉन्ट जस्टिस’, ‘फांसी दो, फांसी दो’ अशा विविध घोषवाक्यांचे फलक झळकवित व जोरदार घोषणाबाजी करत जुने नाशिक परिसरातून बुधवारी (दि. १८) संध्याकाळी कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी मुस्लीम महिला, पुरुष व तरुणांचा लक्षणीय सहभाग होता.जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये आठवर्षीय चिमुरडीवर आठ दिवस पाशवी बलात्कार करून नंतर तिची अमानुषपणे हत्या करणाऱ्या त्या सर्व नराधमांना तसेच उन्नाव बलात्काराच्या घटनेतील संशयित राजकीय आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी व सदर गुन्ह्यांचा खटला जलद न्यायालयात चालविला जावा, या मागणीसाठी जुने नाशिकमधील सर्वपक्षीय नगरसेवकांसह मुस्लीम महिला, तरुण, तरुणी रस्त्यावर उतरल्या.

नगरसेवक समीना मेमन, वत्सला खैरे, हेमलता पाटील, आशा तडवी, नयना गांगुर्डे, राहुल दिवे, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, आकाश छाजेड, शोएब मेमन यांच्यासह मुस्लीम महिलांनी हातावर काळ्या फिती बांधून मेणबत्ती प्रज्वलित करत फुले मंडई ते शालिमार येथील आंबेडकर पुतळ्यापर्यंत संचलन केले. यावेळी सहभागी नागरिकांनी भाजपा सरकारचा निषेध करत या भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात घडणा-या बलात्काराच्या घटना तत्काळ थांबवाव्या, या घटनांमधील संशयितांविरुद्ध जलदगतीने खटला चालविला जावा, अशी मागणी करण्यात आली.

 

टॅग्स :Rapeबलात्कारKathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणJammu Kashmirजम्मू-काश्मीरMuslim Women Rallyमुस्लीम महिला मोर्चाNashikनाशिक