शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

अपक्ष-रिपाइं नगरसेवकाला आचारसंहितेचा फटका

By admin | Updated: July 30, 2016 01:31 IST

पोटनिवडणूक : विकासकामांवर परिणाम

 नाशिक : मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर येत्या २८ आॅगस्टला पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासूनच प्रभाग क्रमांक ३५ आणि ३६ मध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. द्विसदस्यीय प्रभाग असल्याने या आचारसंहितेचा फटका अपक्ष नगरसेवक पवन पवार आणि रिपाइंच्या नगरसेवक ललिता भालेराव यांनाही बसणार असून, महिनाभर विकासकामे ठप्प होणार आहेत. त्यामुळे ‘कुणाचे भोग कुणाच्या नशिबी’ अशी चर्चा प्रभागात सुरू झाली आहे.मनसेचे नगरसेवक नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने मनसेच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी दोघा नगरसेवकांना अपात्र घोषित केले. त्यानुसार त्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर करत येत्या २८ आॅगस्टला मतदान घेण्याचे निश्चित केले. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासूनच प्रभाग क्रमांक ३५ आणि ३६ मध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजे २९ आॅगस्टपर्यंत दोन्ही प्रभागांत आचारसंहिता लागू राहणार असल्याने महिनाभर कोणतीही विकासकामे हाती घेता येणार नाहीत किंवा उद्घाटने, अनावरण सोहळे करता येणार नाही. या आचारसंहितेचा फटका मात्र विनाकारण अन्य दोन नगरसेवकांना बसणार आहे. नाशकात द्विसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग ३५ (अ) मधून पवन पवार हे अपक्ष म्हणून तर ३५ (ब) मधून शोभना शिंदे निवडून आल्या होत्या. तर प्रभाग ३६ (अ) मधून रिपाइंच्या ललिता भालेराव तर ३६ (ब) गटात मनसेचे नीलेश शेलार निवडून गेले होते.(प्रतिनिधी) निवडणूक आचारसंहितेमुळे पवन पवार आणि ललिता भालेराव यांची मात्र कोंडी होणार असून सार्वत्रिक निवडणूक ऐन तोंडावर आली असताना विकासकामांची भूमिपूजने अथवा उद्घाटने करण्यास दोहोंनाही मनाई आहे. आचारसंहितेमुळे प्रभागातील विकासकामेही ठप्प होणार आहेत.