दोन्ही मुद्रणालयांत स्वतंत्र निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:37 AM2018-02-19T00:37:17+5:302018-02-19T00:40:31+5:30

Independent elections in both printstories | दोन्ही मुद्रणालयांत स्वतंत्र निवडणुका

दोन्ही मुद्रणालयांत स्वतंत्र निवडणुका

Next
ठळक मुद्देभारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयवर्क्स कमिटीच्या २९ जागांसाठी १० मार्चला मतदान


 

 

नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील वर्क्स कमिटीच्या २९ जागांसाठी १० मार्चला मतदान होणार आहे. मुद्रणालयामध्ये पहिल्यांदाच मजदूर संघ व वर्क्स कमिटीसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत बदल करण्यात आला असून दोन्ही मुद्रणालयांत स्वतंत्र निवडणूक होणार आहे.
वर्क्स कमिटीच्या द्विवार्षिक निवडणुकीत यापूर्वी विभागवार मतदान होत असे. दोन्ही मुद्रणालयांतील त्या-त्या विभागातील कामगार व त्या विभागांकरिता उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदान करत असे. मात्र मुद्रणालय महामंडळ प्रशासनाने या निवडणुकीपासून निवडणूक प्रक्रियेत बदल केला असून दोन्ही मुद्रणालयात स्वतंत्र निवडणूक होणार आहे. यामुळे वर्क्स कमिटीमध्ये भारत प्रतिभूतीमध्ये एक व चलार्थपत्र मुद्रणालयात- २ जागा वाढल्या आहेत. मजदूर संघ व वर्क्स कमिटी निवडणुकीकरिता आयएसपी- १६६४ व सीएनपीमध्ये १७८० मतदार आहेत. मजदूर संघासाठी दोन्ही प्रेसमधून मतदान होईल. तर वर्क्स कमिटीमध्ये आयएसपी व सीएनपी वेगवेगळे मतदान होणार आहे. वर्क्स कमिटीच्या आयएसपीमध्ये कामगार प्रतिनिधी ११ व स्टाफ अशा एकूण १४ जागा आहेत. सीएनपीमध्ये कामगार प्रतिनिधी- १३ व स्टाफच्या २ अशा एकूण १५ जागा आहेत. दोन्ही प्रेसमध्ये एकूण २९ जागा आहेत. वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत २१ ते २६ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत, २७ फेब्रुवारीला छाननी, उमेदवारी अर्ज माघारी २ मार्च, अंतिम यादी ३ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या वर्षापासून वेल्फेअरची निवडणूक रद्दमुद्रणालयामध्ये वेल्फेअर फंड कमिटीची द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येत होती. त्यामध्ये आयएसपीमधून-८, सीएनपी-७ व दोन्ही मुद्रणालयांतून स्टाफच्या-२ अशा एकूण १७ जागांसाठी निवडणूक घेण्यात येत होती. मुद्रणालय महामंडळ प्रशासनाने इतर मुद्रणालयात वेल्फेअर फंड कमिटीची निवडणूक होत नसल्याने या वर्षापासून आयएसपी-सीएनपीमध्ये वेल्फेअरची निवडणूक न घेण्याचे स्पष्ट केले आहे. मजदूर संघामध्ये ज्यांचे बहुमत येईल तो पॅनल वेल्फेअरकरिता कामगारांमधून प्रतिनिधी (स्वीकृत) निवडेल.

Web Title: Independent elections in both printstories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.