शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
3
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
4
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
5
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
6
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
7
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
8
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
9
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
10
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
12
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
13
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
14
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
15
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
16
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
17
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
18
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

‘वसाका’चे स्वतंत्र लेखापरीक्षण

By admin | Updated: May 5, 2016 22:36 IST

सहनिबंधकांचे आदेश : तत्कालीन २२ संचालकांचे धाबे दणाणले

कळवण : कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सन २००७ ते २०१५ या आर्थिक वर्षातील सर्व कामकाजाचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याचे आदेश पुणे येथील सहकार विभागाचे सहनिबंधक (लेखापरीक्षण) यांनी दिलेल्या आदेशामुळे तत्कालीन संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.सन २००७ ते २०१५ या काळातील स्वतंत्र लेखापरीक्षण करून त्यात अनियमतिता आढळल्यास व गैरव्यवहार झाले असल्यास त्या काळातील २२ संचालक व ३ कार्यकारी संचालकांवर व्यक्तीश: जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांकडे करून योग्य कार्यवाही करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानुसार साखर आयुक्त, सहकार आयुक्त व सहकार विभागातर्फे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.कारखान्यातील घटनात्मक पेच सुटावा यासाठी उर्वरित संचालक मंडळ बरखास्त करण्यात आमचा पाठपुरावा सुरू होता. बरखास्तीनंतर शासकीय प्रशासकांनी प्रयत्न करण्याऐवजी कारखाना मालमत्ता जप्तीत मोठी भूमिका पार पाडली. सन २०१६चा गळीत हंगाम तुटपुंज्या कर्जातून होण्यापेक्षा शासन पॅकेजमधून होणे आवश्यक होते. परंतु वित्तीय शासन हमी प्राधिकृत अधिकारी या गोंडस वातावरणात कारखान्याने कमावले व काय गमावले हे सभासद व कार्यक्षेत्रासमोर येणे आवश्यक असल्याचे सुनील देवरे यांनी सांगितले. कामगार पूर्ण क्षमतेने काम करण्याची ग्वाही देत असताना आपली कार्यक्षमता लपविण्यासाठी व्यवस्थापनाने यापूर्वी कामगार कपातीसारखे बेकायदेशीर प्रयोग केल्याचा आरोप सुनील देवरे व गोविंद पगार यांनी केला आहे.