शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

नाशिक महापालिकेत अधिका-यांवर स्वेच्छानिवृत्तीचा वाढता दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 18:45 IST

म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा आरोप : काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा

ठळक मुद्देआऊटसोर्सिंगच्या नावाखाली संपूर्ण महापालिकाच ठेकेदाराच्या ताब्यात देण्याचा डावदोन वर्षांत तब्बल ११ अधिका-यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे

नाशिक - महापालिकेत अधिका-यांवर स्वेच्छानिवृत्तीचा दबाव वाढत असून आऊटसोर्सिंगच्या नावाखाली संपूर्ण महापालिकाच ठेकेदाराच्या ताब्यात देण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी केला आहे. दरम्यान, कर्मचारी व अधिका-यांना देण्यात येणा-या अपमानास्पद वागणुकीबाबत आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही तिदमे यांनी दिला आहे.म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेच्या कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात कर्मचारी व अधिका-यांवर सत्ताधारी पदाधिका-यांकडून होत असलेल्या अन्यायाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रवीण तिदमे यांनी सांगितले, नाशिक महानगरपालिकेत आधीच रिक्तपदे मोठी आहेत, त्यात दरमहा सेवानिवृत्ती होत आहे. अधिकारी आणि कर्मचा-यांची संख्या कमी असल्याने ते अतिरिक्त कामाचा बोजा घेऊन काम करत असतात. मात्र, पालिकेत सध्या अधिका-यांवर स्वेच्छा निवृत्तीचा दबाव वाढत आहे. पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी नसतांना विषय समित्या, त्यांचे सभापती, पदाधिकारी, नगरसेवक, नागरीक अश्या विविध पातळीवर प्रत्येकाची मर्जी सांभाळणे अधिकारी आणि कामगार वर्गाला शक्य होणार नाही. संपूर्ण नाशिक महानगरपालिकाच आउटसोर्सिंगच्या नावाखाली ठेकेदारांच्या ताब्यात देण्यासाठीच अधिका-यांवर स्वेच्छा निवृत्तीचा दबाव वाढविण्यात येत आहे. दोन वर्षांत तब्बल ११ अधिका-यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मनपा आयुक्तांनी याप्रकरणी गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना अधिका-यांसह रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही तिदमे यांनी दिला आहे. महापालिका ठेकेदारांच्या घश्यात घालण्यापेक्षा राज्यातही सत्ता असणा-या पदाधिका-यांनी पालिकेत नोकर भरतीसाठी विशेषबाब म्हणून मंजुरी मिळवून आणावी. त्यातून अनेकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होऊन अनेक बेरोजगारांचे शुभाशिर्वाद लाभतील. कुणाला नोकरी सोडण्यास लावण्यापेक्षा कुणाला रोजगार देता येतो काय, याचा विचार अधिक व्हावा, असा टोलाही तिदमे यांनी लगावला आहे.संघटनेचे आवाहनम्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना ही कायम नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या पाठीशी असून अधिकारी आणि कर्मचा-यांनी कुणाच्याही दबावाला बळी पडून स्वेच्छा निवृत्ती घेऊ नये. मनपातील उच्च अधिकारी असो कि कर्मचारी, ज्याच्यावरही कुणी दबाव टाकत असेल त्यांनी त्वरित म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहनही संघटनेने केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका