शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बनावट महिला ग्राहकांचा वाढता उपद्रव; दालनांमध्ये दागिण्यांवर हात साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 17:11 IST

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एका सराफाच्या दुकानात बुरखाधारी दोन महिला बनावट ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी सोन्याचे दागिणे सेल्समनकडून बघून घेतले

ठळक मुद्देपंधरा दिवसांत ही तीसरी घटना सराफी दालनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

नाशिक : सध्य लग्नसराईचा काळ सुरू असल्यामुळे सराफी व्यावसायिकांकडेही ग्राहकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेत काही महिला चोर बनावट ग्राहक म्हणून दालनात जाऊन दागिणे खरेदीच्या बहाण्याने हात साफ करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सराफ बाजारात एका व्यावसायिकाच्या दालनात अशाच पध्दतीने सोन्याचे दागिणे चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील पंधरा दिवसांत ही तीसरी घटना समोर आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एका सराफाच्या दुकानात बुरखाधारी दोन महिला बनावट ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी सोन्याचे दागिणे सेल्समनकडून बघून घेतले. बुधवारी (दि.१०) सायंकाळी या बनावट महिला ग्राहकांनी हातचलाखीने १८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दोन झुबे हातोहात लंपास केल्याची फिर्याद सेल्समन पुंडलिक पवार यांनी दिली आहे. दोन महिलांपैकी एकीने पवार यांच्याशी सतत संवाद साधत विविध प्रकारची माहिती जाणून घेण्याचा बनाव करत दिशाभूल केली तर त्या महिलेची दुसरी साथीदार महिला चोराने झुबे गायब केले.सराफी दालनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असूनदेखील सर्रासपणे बनावट महिला ग्राहकांकडून सोन्याचे दागिणे लंपास करण्याच्या घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आठवडाभरापुर्वीच कॉलेजरोडवरील दोन सराफाच्या दुकानातून अशाच पध्दतीने यापुर्वीदेखील गुन्हे घडले आहेत. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होत नाही तोच पुन्हा तीसरा गुन्हा घडल्याने सरकारवाडा गुन्हे शोध पथकापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.

टॅग्स :theftचोरीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय