शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा वाढता विस्तार, सरसावला यांत्रिकी विभाग

By suyog.joshi | Updated: September 15, 2023 19:01 IST

शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे महापालिकेचा यांत्रिकी विभाग सरसावला असून सहाही विभागात पंचवीस किमीच्या ४१ ठिकाणी मलवाहिका टाकण्यात येणार असून यासाठी २२ कोटी खर्च येणार आहे.

नाशिक : शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे महापालिकेचा यांत्रिकी विभाग सरसावला असून सहाही विभागात पंचवीस किमीच्या ४१ ठिकाणी मलवाहिका टाकण्यात येणार असून यासाठी २२ कोटी खर्च येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चोहोबाजूंनी नाशिकचे वीस किलोमीटरचे क्षेत्र वाढले आहे. दरम्यान नव्याने विकसित झालेल्या या भागात सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची असते. त्यानुसार महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून या कामासाठी ४१ निविदा काढल्या असून याच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करुन कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. नाशिकरोड, सातपूर, पंचवटी, नाशिक पूर्व, नवीन नाशिक व पश्चिम या सहाही विभागात मोठ्या संख्येने इमारती व संकुले उभारली जात असल्याने रहिवाशी भाग वाढला आहे.

२२ कोटींच्या कामांमध्ये ज्या ४१ ठिकाणी मलवाहिकेचे कामे केली जाणार आहे. यामध्ये नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक ३१ मधील सर्वाधिक २ कोटी ४९ लाख ९२ हजार ३९७ रुपयांचे काम आहे. याखाली नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १६ येथील आगर टाकळी तील पंचशील नगर, आंबेडकर नगर, राहुल नगर येथील परिसरात मलवाहिका टाकण्यासाठी १ कोटी ९२ लाख ९८ हजार, पंचवटीतील प्रभाग ६ मधील विविध ठिकाणच्या मलवाहिका टाकण्यासाठी १ कोटी ६२ लाख २९ हजार तर नाशिकरोड मधील प्रभाग २२ मध्ये १ कोटी ४९ लाख ६३ हजार एवढा खर्च येणार आहे. वरील आर ठिकाणी दीड कोटी ते दोन कोटी पर्यत मलवाहिका टाकण्याचा खर्च आहे. उर्वरीत ३७ ठिकाणी २४ ते ९९ लाखांचा खर्च येणार आहेत. ठेकेदारांना २० सप्टेंबरपर्यंत मुदतनव्याने विकसित झालेल्या या परिसरात मलवाहिका टाकल्यानंतर येणारा ताण कमी होणार आहे. या कामांसाठी ठेकेदारांना २० सप्टेंबर पर्यत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी २१ सप्टेंबर रोजी सहाही विभागातील निविदा खूल्या करण्यात येतील. 

टॅग्स :Nashikनाशिक