शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

मागणी वाढल्याने फुलांच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:40 IST

नाशिक : गौरी गणपतीमुळे फुलांची मागणी वाढत चालल्याने हार आणि फुले महागले आहेत. बुधवारी गौरी पुजनाच्या निमित्ताने फुल बाजारात दर वाढलेले आढळले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत फुलांचे भाव मात्र कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देकोरोनामुळे ग्राहकांची फुल बाजारातील संख्या रोडावली आहे.

नाशिक : गौरी गणपतीमुळे फुलांची मागणी वाढत चालल्याने हार आणि फुले महागले आहेत. बुधवारी गौरी पुजनाच्या निमित्ताने फुल बाजारात दर वाढलेले आढळले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत फुलांचे भाव मात्र कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.सणासुदीमुळे फुलांना दरवर्षी मागणी वाढते. त्यामुळे दर देखील तेजीत असतात. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मर्यादीत असल्याने गणेशोत्सव काळात असणारी फुलांची मागणी यंदा नाही. दरवर्षी गणेशोत्सव काळात लहान मोठे हजारो हार रोज खपतात, मात्र यंदा मोजकेच गणपती असून गल्ली बोळात तर लहान मंडळांनी गणेशोत्सवच साजरा केलेला नाही. त्यामुळे अपेक्षीत मागणी नाही. फुलांच्या सजावटी यंदा नाही. कोरोनामुळे ग्राहकांची फुल बाजारातील संख्या रोडावली आहे. मात्र, दोन दिवस गौरींच्या आगमनामुळे नियमीत कालावधीत असलेल्या फुलांपेक्षा दर जास्त होते. देवी देवतांना लागणा-या पत्री, जास्वंदी, शेवंती, गुलाब त्याच बरोबरच जास्वंदीचे हार आणि अन्य फुल हार देखील चाळीस रूपयांपासून दीडशे रूपयांपर्यंत गेले आहेत. वेणी वीस रूपये तर चांगली डांगराची फुले वीस ते चाळीस रूपये या दराने होते. मुकी जास्वंद तर पाच रूपयांना एक या प्रमाणे उपलब्ध होती. दुर्वा आणि पांढ-या दुर्वांचे दर दहा रूपयांपासून पुढे आहेत. गणपतीपाठोपाठ गौरींचे आगमन झाल्याने मागणी वाढल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :MarketबाजारNashikनाशिक