शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

भाऊबंदकीच्या वादातून वाढोलीला हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:35 IST

त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या वाढोली येथील एका कुटुंबास भाऊबंदकीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी १४ जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसात जखमी : १४ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल

त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या वाढोली येथील एका कुटुंबास भाऊबंदकीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी १४ जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.                महेश भास्कर महाले (वय २०) रा.वाढोली ता.त्र्यंबकेश्वर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादित म्हटले आहे की, रविवारी (दि.७) दुपारी साडे तीन वाजता फिर्यादीची आई सिंधूबाई घरात असताना संशयित आरोपी गणेश दिनकर महाले, निवृत्ती दिनकर महाले, संदीप दिनकर महाले, रामकृष्ण बाळू महाले, संतोष बाळु महाले, बाळू हनुमंत महाले, दिनकर हनुमंत महाले, जिजाबाई बाळू महाले, स्वाती संतोष महाले, गायत्री रामकृष्ण महाले, ताराबाई दिनकर महाले, अश्विनी निवृत्ती महाले, स्वाती गणेश महाले व सरला संदीप महाले यांनी घरात घुसून सिंधूबाईस बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

                         तसेच फिर्यादीचे वडील भास्कर यांना लोखंडी रॉडने व कोयत्याने मारहाण केली. यामध्ये सात जण जखमी झाले. त्यांना त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यातील चार गंभीर जखमींना नाशिक येथे हलविले, तर तीन जण त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

                     दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर संशयितांविरुद्ध जबर मारहाणीचा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी भीमाशंकर ढोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, हवालदार घोडे, पोलीस नाईक प्रदीप भाबड हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस