शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कोलती नदीवरील अरुंद पुलामुळे अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 16:50 IST

देवळा : प्रस्तावित नवीन पुल उभारण्याची मागणी

ठळक मुद्देदहा वर्षांपूर्वी माजी मंत्री स्व. ए.टी. पवार यांच्या पुढाकारातून भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी कोलती नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली.

देवळा : देवळा बसस्थानकाकडून दुर्गामाता मंदिरात जाण्यासाठी दहा वर्षांपूर्वी कोलती नदीवर बांधण्यात आलेला पूल अरूंद असल्यामुळे आता तो अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या पाठीमागे कोलती नदीवर प्रस्तावित असलेल्या नवीन पुलाची निर्मिती करून नागरीकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी भाविकांनी तसेच शेतकऱ्यांनी केली आहे.कोलती नदीच्या काठावर असलेल्या ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते. परंतु कोलती नदीला पाणी वाहत असेल तर भाविकांची मंदिरात जाण्यासाठी मोठी गैरसोय होत होती. दहा वर्षांपूर्वी माजी मंत्री स्व. ए.टी. पवार यांच्या पुढाकारातून भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी कोलती नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली. हा पूल सबमर्सिबल असल्यामुळे त्याला कठडे नाहीत. ह्या पुलाचा लाभ भाविकांबरोबरच मंदिर परीसरात शेतावर वस्ती करून राहत असलेल्या शंभरहून अधिक शेतकऱ्यांना देखील झाला. पावसाळयात नदीला पूर आला तर ह्या शेतकºयांचा गावाशी असलेला संपर्क तूटून जात असे. रूग्णाला दवाखान्यात आणणे, तसेच शेतीमालाची वाहतूक करणे देखील शक्य होत नसे. पुलाच्या निर्मितीमुळे त्यांची मोठी गैरसोय दूर झाली. तसेच मंंदिर परिसरात रविवारी भरणाºया आठवडे बाजारात जाणाºया नागरीकांची व वाहनांची चांगली सोय झाली. परंतु रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी ह्या पुलावर नागरीकांची मोठी गर्दी होते. पूल अरूंद असून पुलाच्या काठावर दोन्ही बाजूनी भाजीपाला विक्र ेते आपला भाजीपाला समोर ठेवून विक्री करत असतात. भाजीपाला घेणारे ग्राहक जागेवरच थांबतात. विक्र ेत्यांच्या व ग्राहकांच्या गर्दीतून मार्ग काढत पुलावरून जावे लागते. यामुळे हया पुलावर येणाºया व जाणाºया ग्राहकांची एकच गर्दी उसळते. खिसेकापूंसाठी हि गर्दी म्हणजे पर्वणीच असते. तसेच मंदीर परीसरात राहणाºया शेतकºयांना त्यांची वाहने गावात आणणे शक्य होत नाही. यामुळे नवीन पुलाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक