शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिमार्गातील गोडी वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 01:34 IST

ओझर : एखादा गोड पदार्थ सारखा खात राहिला की त्याचा वीट येतो, मात्र भगवंताचे आणि सदगुरूंचे नामस्मरण कितीही वेळा घ्या त्याची गोडी अधिकाधिक वाढतच जाते. याला ह्यअवीटह्ण गोडी म्हणतात. ही गोडी दिवसागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत जाते. म्हणूनच म्हणतात गोड तुझं नाव देवा, गोड तुझे रूप. भाविकांनी भक्तिमार्गातील गोडी वाढवावी, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.

ठळक मुद्देस्वामी शांतिगिरी महाराज : ओझरला सत्संग

ओझर : एखादा गोड पदार्थ सारखा खात राहिला की त्याचा वीट येतो, मात्र भगवंताचे आणि सदगुरूंचे नामस्मरण कितीही वेळा घ्या त्याची गोडी अधिकाधिक वाढतच जाते. याला ह्यअवीटह्ण गोडी म्हणतात. ही गोडी दिवसागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत जाते. म्हणूनच म्हणतात गोड तुझं नाव देवा, गोड तुझे रूप. भाविकांनी भक्तिमार्गातील गोडी वाढवावी, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.ओझर येथील जनशांतिधाम परिसरातील निष्काम कर्मयोगी जगद‌्गुरू जनार्दन स्वामी आश्रमात सत्संग-प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा प्रारंभ ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी पठनाने करण्यात आला. यावेळी प्राणायाम, ध्यान, सार्थ एकनाथी भागवत ग्रंथाचे वाचन करण्यात आले. यानंतर आरती, सत्संग आदी सोहळा फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत संपन्न झाला. यावेळी आश्रम परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.

स्वामी शांतिगिरी महाराज उपस्थित भाविकांना संदेश देताना म्हणाले, की आपण दुसऱ्याचे भले केले तर आपल्या जीवनातील गोडवादेखील निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याचे भले करा, दुसऱ्याचे हित जोपासा, लहानथोर, घरातील वडीलधारी मंडळी यांचा सन्मान करा. यासोबतच प्रत्येकाला अनुष्ठान करा, यज्ञ करा, जप लिहा,जप वह्या वाटा, अन्नदान करा व असे कर्म करा की जेणेकरून दुसऱ्याचे पुण्य वाढेल आणि त्यांचे भले होईल.

टॅग्स :OzarओझरSocialसामाजिक