शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

ओझरनजीक वाहतूक कोंडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 18:21 IST

सध्या मुंबई - आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून ड्यूटीवर असलेले पोलीस कर्मचारी त्यात आणखी भर टाकत तेथेच पावत्या फाडत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देरुग्ण, विद्यार्थ्यांचे हाल : पोलिसांच्या पावती फाड मोहीमेमुळे संताप

ओझर : सध्या मुंबई - आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून ड्यूटीवर असलेले पोलीस कर्मचारी त्यात आणखी भर टाकत तेथेच पावत्या फाडत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.महामार्गावर नाशिक ते ओझरदरम्यान काही वर्षांपूर्वी सहा पदरीकरण झाले होते. परंतु ओझर येथील खंडेराव मंदिर, गडाख कॉर्नर, लक्ष्मीनगर, जत्रा हॉटेल, हनुमाननगर, अमृतधाम येथे कायम होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हजारो वाहनधारक त्रस्त होते. परिणामी लेट का होईना येथे कामं मंजूर झाली व तीन उड्डाणपुलांचा समावेश करण्यात आला.वाहतुकीचे तीन तेरायेथील तात्पुरती वाहतूक पोलीस चौकी मात्र दंड वसुलीचे ठिकाण बनल्याचे दिसून आल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. चांदवड, पिंपळगाव, ओझर, आडगाव येथून दररोज हजारो नागरिक, अनेक रुग्ण, नोकरदार, विद्यार्थी नाशिक शहरात ये-जा करत असताना त्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. सदर वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून दंड वसुलीच्या नावाखालीच अनेक वेळा स्थानिक वाहतूक शाखेचे पोलीस झालेली कोंडी वाऱ्यावर सोडून देत असल्याने त्याचा फटका सामान्य माणसाला बसतोय. याबाबत स्थानिक नागरिकांनी तसेच नोकरदार, विद्यार्थिवर्गाने याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.सदर कामांना सुरुवात झाल्यानंतर येथे सकाळ सायंकाळ होत असलेली वाहतूक कोंडी वाहधारकांना डोकेदुखी ठरत असताना ती सुरळीत करण्यासाठी अमृतधाम, हनुमाननगर येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या समवेत हंगामी कर्मचारी वाहनांच्या रांगा सुरळीत करीत असताना पोलीस मात्र त्या कोंडीत भर घालत असल्याचे चित्र बघण्यास मिळत असून, एकेरी करण्यात आलेल्या रस्त्यावर अवजड वाहनदेखील मोठ्या प्रमाणावर ये - जा करत असताना समांतर रस्त्याचा उपायदेखील उपलब्ध असून, केवळ त्याचा सुरळीत अवलंब केला जात नाही. जिथे क्र ॉसिंग आहे तिथे चेहरा पाहून सर्वच प्रकारच्या वाहनांना अडविले जाते व जोपर्यंत देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी झालेली असते.

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस