शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गिरणाच्या पाण्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:16 IST

श्रावण महिन्यातील शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने गिरणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली आहे, तर गिरणा धरणात सद्य:स्थितीत ५८.८० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

ठळक मुद्दे पिकांना संजीवनी : नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

साकोरा : श्रावण महिन्यातील शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने गिरणा धरणाच्यापाणीपातळीत वाढ झाली असून, खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली आहे, तर गिरणा धरणात सद्य:स्थितीत ५८.८० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव तालुक्याबरोबरच जळगाव जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेल्या गिरणा धरणाने पन्नाशी ओलांडली असून, परिसरातील बळीराजा सुखावला आहे. गतवर्षी तब्बल ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गिरणा धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्नाबरोबरच सिंचनाचा प्रश्नदेखील मिटला होता. गेल्या आठवडाभरात गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हरणबारी, ठेंगोडा बंधारादेखील शंभर टक्के भरले आहे. गिरणा डॅम ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने नांदगाव शहरासह तालुक्यातील ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेबरोबरच मालेगाव शहरासह तालुक्यातील दहीवाळ, कळवाडीसह पाणीपुरवठा योजना १२ खेडी पाणीपुरवठा योजना तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठाकरणाºया ग्रामपंचायतीच्या सर्व योजनांना संजीवनी मिळणार आहे.

गतवर्षी गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने नाशिक व जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाणीप्रश्नाबरोबरच सिंचनाचा प्रश्नदेखील मोठ्या प्रमाणावर निकाली निघाला होता. यावर्षीदेखील गिरणा धरण शंभरी गाठेल असा विश्वास आहे. अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही निकाली निघण्यास मदत होणार असून, शेतपिकांचा रब्बी हंगामदेखील मोठ्या प्रमाणात बहरण्यास मदत होणार आहे.- एस. आर. पाटील, शाखा अभियंता, गिरणा धरण

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बळीराजाने पिकवलेल्या शेतमालाला पाहिजे तसा बाजारभाव न मिळाल्याने बळीराजा नाराज झाला होता. मात्र यावर्षी धरण शंभर टक्के भरणार असून, पुन्हा आम्ही शेतकरी जोमाने घाम गाळून चांगल्या प्रकारे धनधान्य पिकवू. शासनाने चांगला बाजारभाव द्यावा अशी अपेक्षा.- भिकन पगार, शेतकरी

टॅग्स :DamधरणWaterपाणी