शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष निर्यातीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:07 IST

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे कंटेनरच्या माध्यमातून सुमारे एक लाख टनाहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लंडच्या बाजारपेठेत निर्यात झाली होती, तर एकट्या रशियात सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, श्रीलंका, बांगलादेश, मध्य-पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरू असून, एप्रिल अखेरपर्यंत निर्यातीचा आकडा दोन लाख टनांचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देएक लाख टन : इंग्लंड, युरोपसह रशियामध्येही भारतीय द्राक्षांना मागणी

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे कंटेनरच्या माध्यमातून सुमारे एक लाख टनाहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लंडच्या बाजारपेठेत निर्यात झाली होती, तर एकट्या रशियात सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, श्रीलंका, बांगलादेश, मध्य-पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरू असून, एप्रिल अखेरपर्यंत निर्यातीचा आकडा दोन लाख टनांचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून ८८ हजार २०२ टन द्राक्ष युरोपीय बाजारपेठेत निर्यात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन आतापर्यंत तब्बल एक ते सव्वा लाख टन द्राक्ष निर्यात झाली आहे. पाणीटंचाई, दीर्घकाळ रेंगाळलेली थंडी याचा परिणाम होऊनही यंदा द्राक्षांची आवक वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा गारपिटीसारखी मोठी आपत्ती द्राक्षांवर कोसळली नाही. त्यामुळे द्राक्षांचे उत्पादन वाढलेले असताना देशांतर्गत तसेच युरोपच्या बाजारपेठेत आवक जास्त असल्याने द्राक्ष बाजारात मंदीचेच वातावरण पहायला मिळाले.पेरू देशाच्या द्राक्षांसोबत प्रथमच स्पर्धा युरोपीय बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची स्पर्धा दक्षिण आफ्रिका व चिली यांसारख्या देशांमध्ये उत्पादित होणाऱ्या द्राक्षांसोबत असते. यंदा त्यात पहिल्यांदाच पेरूची भर पडली. फेब्रुवारीपर्यंत एकट्या पेरूमधून युरोपात१५ हजार टनांची द्राक्ष निर्यात झाली होती. त्याशिवाय भारतातून दर आठवड्याला होणाऱ्या कंटेनरच्या संख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ होतहोती. या स्थितीत निर्यातक्षम द्र्राक्षांच्या दरातही यंदा ३ ते ४ युरोंनी घट झाली होती. परंतु आता परिस्थिती सुधारली असून, लेट हार्व्हेस्टिंग झालेल्या मालाला चांगली मागणी मिळत आहे. द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, जवळपास ८० टक्के हंगाम आटोपला आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत द्राक्षांच्या दरात ४० ते ५० टक्यांनी वाढ झाली आहे. मात्र, दर वाढल्यामुळे परराज्यातून मागणी काही प्रमाणात स्थिरावली आहे. द्राक्षांना प्रतिकिलोला किमान ३५ ते ४५ व सरासरी ४० रुपये दर मिळाला असून, अखेरच्या टप्प्यात निर्यातक्षम द्राक्षांना ९० रुपयांपर्यंतही दर मिळत आहे. येत्या काही कालावधीत हा दर टिकून राहील, अशी अपेक्षा आहे.- माणिकराव पाटील, माजी अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ