शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

डेंग्यूमुळे रक्तबिंबिकांच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 5:42 PM

रक्तपेढ्यांमध्ये वर्दळ : शिबिरांच्या माध्यमातून संकलन

ठळक मुद्देडेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे. त्यातच रक्तस्त्रावाचा ताप असल्यास रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेटस् अर्थात रक्तबिंबिंकांचे प्रमाण कमालीचे घटते.

नाशिक - गेल्या तीन-चार वर्षांपासून डेंग्यूच्या आजाराने शहराला पछाडले असून दिवसेंदिवस डेंग्यू संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. डेंगी तापामुळे शरीरातील प्लेटलेटस् अर्थात रक्तबिंबिंकांचे प्रमाण कमी होत असल्याने प्लेटलेटस्ला रक्तपेढ्यांतून मागणी वाढत आहे. त्या तुलनेत वेळेत पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी रक्तपेढ्यांकडून शिबिरांवर अधिकाधिक भर दिला जात आहे.डेंग्यूने नाशिककरांची अद्यापही पाठ सोडलेली नाही. डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात आढळून येत असल्याने नाशिक महापालिकेने घरोघरी जाऊन पाणी साठे तपासणी मोहीम सुरू केली असतानाच लोकांचे प्रबोधनही केले जात आहे. डेंगीचे डास हे प्रामुख्याने फ्रीज, कुंड्या, पाण्याच्या टाक्या यामध्ये आढळून येत असल्याने सदर पाणी नष्ट करण्याची मोहीम राबविली जात आहे. शहरातील बव्हंशी खासगी व शासकीय तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण उपचार घेताना दिसून येत आहेत. डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे. त्यातच रक्तस्त्रावाचा ताप असल्यास रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेटस् अर्थात रक्तबिंबिंकांचे प्रमाण कमालीचे घटते. त्यातून रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे रुग्णाच्या शरीरात प्लेटलेटस्चे प्रमाण वाढविण्यासाठी रक्तपेढ्यांकढडे प्लेटलेटस्ची मागणी केली जाते. त्यात रॅँडम डोनर प्लेटलेटस्च्या माध्यमातून ५ ते ७ हजार प्लेटलेटस् वाढतात तर सिंगल डोनर प्लेटलेटस्च्या माध्यमातून ५० हजार प्लेटलेटसने वाढ होते. प्लेटलेटसचा साठा हा पाच दिवसांच्यावर टिकू शकत नाही. त्यामुळे रक्तपेढ्यांना शिबिरांच्या माध्यमातून त्याच्या संकलनावर भर द्यावा लागत आहे. रक्तपेढ्यांमध्ये सद्यस्थितीत प्लेटलेटसच्याच रक्तपिशव्यांना जादा मागणी असल्याचे दिसून येते. सर्वसाधारणपणे सिंगल डोनर प्लेटलेटस्च्या ५ ते ७ आणि रॅँडम डोनर प्लेटलेटस्च्या किमान ३० ते ४० रक्तपिशव्या प्रत्येक रक्तपेढ्यांतून वितरित होत आहेत. प्लेटलेटस्च्या रक्तपिशव्यांची किंमतही परवडणारी नसल्याने सामान्य रुग्णांची मात्र आर्थिक परवड होत असते.प्लेटलेटस्ला मागणीशहरात डेंग्यूची साथ असल्याने सध्या प्लेटलेटस्ला मागणी वाढली आहे. प्लेटलेटस् या पाच दिवसांपर्यंत टिकतात. त्यामुळे त्यांचा अधिक काळ साठा करून ठेवता येत नाही. परिणामी, वारंवार रक्तदान शिबिरे घ्यावी लागतात.- डॉ. एन. के. तातेड, अर्पण रक्तपेढी१३० रक्तपिशव्या जमानाशिक शहरात डेंग्यूची साथ सुरू असल्याने रक्ताला मागणी वाढली आहे. त्यामुळे आमच्या गोंदे येथील पेलिकन आॅटोमोटिव्ह आणि प्रमोशन प्रॉडक्ट कंपनीने खास प्लेटलेटस्साठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात १३० रक्तपिशव्या जमा झाल्या.- रवीकिरण मोरे, प्रशासकीय अधिकारी

टॅग्स :Nashikनाशिकdengueडेंग्यू