शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पांडवनगरी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:05 IST

पांडवनगरी परिसरात सुुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यांचे मिळकतधारक बाहेरगावी स्थायिक झाले असून, भाडेतत्त्वावर कोण राहतात, काय करतात याचा थांगपत्ता नाही त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढच होत चालली असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात सुुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यांचे मिळकतधारक बाहेरगावी स्थायिक झाले असून, भाडेतत्त्वावर कोण राहतात, काय करतात याचा थांगपत्ता नाही त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढच होत चालली असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सुमार पंधरा वर्षांपूर्वी पांडवनगरी परिसरात सरकारी योजनेतून सुमारे अडीच हजार सदनिका बांधण्यात आल्या आहेत. बहुतेककर्मचाऱ्यांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. शासकीय कर्मचाºयांचा हा एकप्रकारे व्यवसाय झाला असून, स्वत: मात्र आलिशान घरात राहून सरकारी घरे मात्र भाडेतत्त्वावर देण्याचे प्रकार वाढीस लागत आहे. याप्रकारे ज्या गरजू कर्मचाºयांना खºया अर्थाने घरांची गरज आहे त्यांना मात्र घरे मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यातच सुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देणारे मिळकतधारक बाहेरगावी स्थायिक आहेत. त्यांची घरे भाडेतत्त्वावर देण्याचे व्यवहार काही स्थानिक दलाल करीत आहेत. सदर दलाल सदनिका भाडेतत्त्वावर देताना संबंधित भाडेकरूची माहिती स्वत: घेत नाही आणि पोलीस ठाण्यात कळवत नाही त्यामुळे सदर सदनिकांमध्ये कोण राहते? काय करते? याचा थांगपत्ता लागत नाही त्यामुळे गुन्हेगारी प्रवृतीत वाढ होत असून, परिसरातील सहा ते सात जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारे पाच दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक ३०चे दोन नगरसेवकांच्या वाहनांच्या काचा फोडल्या प्रकरणी पांडवनगर परिसरातील दोन जणांना अटक केली होती, तर एकास ताब्यात घेतले होते. अशाप्रकारे एकामागून एक गुन्हेगारीच्या घटना परिसरात दिवसगणिक वाढतच आहे.तपासणी मोहीम हाती घ्यावीपरिसरात वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी एकाच वेळेस मोठा फौजफाटा घेऊन भाडेकरू तपासणी मोहीम हाती घ्यावी आणि भाडेकरूंची माहिती दडविणाºयावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परिसरातील मिळकतधारकांनी सदनिका भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय मांडला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा