शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तुरदाळ खपविण्यासाठी रेशनच्या कमिशनमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:04 IST

दोन वर्षापुर्वी वर्षी राज्यात तुरदाळीचे उत्पादन घटल्यामुळे बाजारातील मागणी व पुरवठ्याची घडी विस्कटली होती, परिणामी ऐन सणासुदीत ग्राहकांना खुल्या बाजारातून ९० ते १०० रूपये किलो दराने तुरदाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जबाबदार धरले होते तर सरकारनेही या संकटावर मात करण्यासाठी तुरदाळ आयात केली होती, त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

ठळक मुद्देजुनमध्ये वाटप : शासनाकडे लाखो क्विंटल दाळ पडून

नाशिक : एकेकाळी शंभरी पार केलेल्या तुरदाळीचे वाढते महत्व लक्षात घेता शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या अमाप पीकामुळे यंदा तुरदाळ सामान्यांच्या आवाक्यात असली तरी, हमीभावाने राज्य सरकारने खरेदी केलेली परंतु उठावा अभावी पडून असलेली तुरदाळ रेशनमधून विक्री करण्यासाठी दुकानदारांनाचा प्रोत्साहन देण्यासाठी कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदारांनी रेशनमधून तुरदाळ विक्रीसाठी उत्सुकता दर्शविली असून, जून महिन्यांसाठी ५५० क्विंटल दाळीची मागणी नोंदविण्यात आली आहे.दोन वर्षापुर्वी वर्षी राज्यात तुरदाळीचे उत्पादन घटल्यामुळे बाजारातील मागणी व पुरवठ्याची घडी विस्कटली होती, परिणामी ऐन सणासुदीत ग्राहकांना खुल्या बाजारातून ९० ते १०० रूपये किलो दराने तुरदाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जबाबदार धरले होते तर सरकारनेही या संकटावर मात करण्यासाठी तुरदाळ आयात केली होती, त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तुरदाळीने कधी नव्हे इतका भाव खाल्याने सरकारने तुरदाळ लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहीत तर केलेच परंतु तुरीला मिळणारा भाव पाहून गेल्या वर्षी तुरदाळीच्या लागवड क्षेत्रातही वाढ झाली. परिणामी राज्यात बंपर पीक आले. त्यामुळे खुल्या बाजारातील शेतकºयांनी तुर कमी भावाने खरेदी करण्यास सुरूवात केल्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हमीभावाने म्हणजेच ५० रूपये ५० पैसे दराने तूर खरेदी केंद्रे सुरू केली. राज्यात सुमारे १६ लाख क्विंटल तूर हंगामात खरेदी करण्यात आली. त्यामानाने त्याचा उठाव होवू शकला नाही. गेल्या चार महिन्यात जेमतेत ३ लाख क्विंटल तुरीची भरडाई होवून ती रेशनमधून विक्री करण्यात आली. डिसेंबर महिन्यात राज्य सरकारने रेशनमधुन ५५ रूपये किलो प्रमाणे प्रत्येकी एक किलो तुरदाळ देण्याचा निर्णय घेतला. परंतु खुल्या बाजारात पॉलीश केलेली उत्तम प्रतिची तुरदाळ ६० ते ६५ रूपयांपर्यंत मिळत असताना रेशनमधील तुरदाळ घेण्यास ग्राहकांनी नाके मुरडली. त्यामुळे नंतर तिची मागणीच नोंदविली गेली नाही. आता मात्र राज्य सरकारवर तुरीचे संकट कोसळले असून, लाखो क्विंटल तुरीचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा रेशनमधूनच ग्राहकांना ती सक्तीने विक्री करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी रेशन दुकानदारांना प्रोत्साहन देण्यात आले असून, त्यांच्या कमिशनमध्ये घसघशीत ३ रूपये वाढ करण्यात आली आहे जेणे करून त्यांनी अधिक तूर विक्री करावी.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक