नाशिक : निराधार व्यक्तींच्या अनुदानात वाढ करावी, तसेच सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता देण्यात यावा, यांसह विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागातर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शालिग्राम बनसोडे यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती विभागाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील निराधार व सुुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्यांसंदर्भात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना बुधवारी निवेदन सादर केले. दिव्यांग लाभार्थींची हेळसांड टाळण्यासाठी त्यांना धान्य वाटपासाठी विशेष दिवस उपलब्ध करून द्यावा. महात्मा फुले आर्थिक महामंडळ अण्णा भाऊ साठे महामंडळ, अपंग महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ, ओबीसी महामंडळ, आदि कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात यावी, अशा विविध मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
निराधारांच्या अनुदानात वाढ करावी
By admin | Updated: September 8, 2016 01:27 IST