शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चार्वाक चौक, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर अपघातांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:16 IST

गेल्या काही दिवसांपासून संत चार्वाक चौक ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर अपघात वाढल्याने या मार्गावर गतिरोधक व सांकेतिक फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक अर्चना जाधव यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संत चार्वाक चौक ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर अपघात वाढल्याने या मार्गावर गतिरोधक व सांकेतिक फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक अर्चना जाधव यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंबंधी महापालिकेच्या पूर्व विभागाचे विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले की, संत चार्वाक चौक ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर नेहमीच लहान- मोठे अपघात होत असतात. याला कारण या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या चौकाजवळ शाळा, महाविद्यालय व दवाखाने असल्याने रहदारीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या शुक्रवारी रात्रीच्या वेळी या रस्त्यावर समारासमोर धडक होऊन एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला.या रस्त्याच्या दुतर्फा कॉलनी वसाहती असून, बºयाच ठिकाणी रस्त्यालगत आणि रस्त्यावरच बांधकामाचे साहित्य पडलेले असते. त्यामुळे समोरासमोरून वाहने वेगात आल्याने वाळू, रेतीवरून वाहने घसरून पडतात. त्यामुळे या ठिकाणी गतीरोधक उभारावेत तसेच सांकेतिक फलक लावावेत. याबाबत तातडीने दखल घेऊन करवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर अर्चना जाधव, अ‍ॅड. सुषमा पाटील, योगीता सासे, पद्मिनी वारे आदींसह पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAccidentअपघात