शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

सटाणा-मालेगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 7:26 PM

ब्राह्मणगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर काही दिवसांपासून मोठ्या खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून खड्डे टाळण्याच्या नादात अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सदर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देवाहनचालक संतप्त : खड्डे बुजविण्याची मागणी

ब्राह्मणगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर काही दिवसांपासून मोठ्या खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून खड्डे टाळण्याच्या नादात अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सदर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.सटाणा-मालेगाव रस्ता हा गुजरात राज्याला जोडणारा असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ अधिक असते. तसेच सटाणा कृषी मार्केटला शेतीमाल विक्रीसाठी जाणारे ट्रॅक्टर, मोटारसायकल, प्रवासी वाहतूक करणारी वाहने अशी अनेक प्रकारची वाहने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. या रस्त्यावर सटाणा ते ब्राह्मणगावपर्यंत दीडशेहून अधिक खड्ड्यांची संख्या आहे.

     एक खड्डा टाळत असताना वाहन दुसऱ्या खड्ड्यात केव्हा जाऊन पडेल व मागून येणारे वाहन पहिल्या वाहनावर केव्हा येऊन आदळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे सदर दुरवस्था झालेल्या रस्त्यामुळे मागील आठवड्यात अनेक अपघात झाले. भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न वाहनधारकांकडून विचारला जात आहे. सदर खड्डे त्वरित बुजवण्याची कार्यवाही व्हावी अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असे संतप्त वाहनधारकांत बोलले जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात