शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड मागणाऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:04 IST

भूखंड मिळण्यासाठी उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे केलेले सर्व अर्ज महामंडळाने रद्द (रिजेक्ट) करण्याचा सपाटा लावला असून, यापुढे फक्त आॅनलाइन अर्जाचाच विचार केला जाणार आहे.

सातपूर : भूखंड मिळण्यासाठी उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे केलेले सर्व अर्ज महामंडळाने रद्द (रिजेक्ट) करण्याचा सपाटा लावला असून, यापुढे फक्त आॅनलाइन अर्जाचाच विचार केला जाणार आहे. रद्द (रिजेक्ट) केलेल्या अर्जामुळे ज्येष्ठता (सिनियरिटी) डावलली जाणार आहे. शिवाय आॅनलाइनसाठी एमआयडीसीची साइट कधीच ओपन होत नसल्याने अडचणी वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे पारदर्शकतेऐवजी अर्थपूर्ण घडामोडींना चालना मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.  जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत भूखंड मिळावा म्हणून नवद्योजकांसह उद्योग विस्तारासाठी अनेक उद्योजक एमआयडीसीकडे अर्ज करीत आहेत. काही उद्योजक आॅनलाइन अर्ज करीत आहेत. एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाकडून आॅफलाइनदेखील अर्ज स्वीकारण्यात येत होते. त्यामुळे आपल्याला कधीतरी भूखंड मिळेल अशी स्वप्ने अर्जदार पाहत होते. अशी परिस्थिती गेल्या पाच सात वर्षांपासून सुरू आहे. मात्र आॅनलाइन अर्ज दाखल केलेल्यांना भूखंड तर सोडाच त्यांचे अर्ज रिजेक्ट करण्याचा धडाका एमआयडीसीकडून लावला आहे. अर्ज रिजेक्ट केल्यामुळे ज्येष्ठता डावलली जात असून, पुन्हा आॅनलाइन अर्ज केल्यास कधी अर्ज विचारात घेतला जाईल. याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अर्ज रिजेक्ट करावयाचा होता तर अर्ज दाखल करूनच कसा घेतला. असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी एमआयडीसीची वेबसाइट कधीच ओपन होत नसल्याच्या उद्योजकांच्या तक्रारी वाढत आहेत. या तक्रारींचे निराकरण करण्याऐवजी भूखंड मागणाºयांना प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी भलताच सल्ला देण्यात धन्यता मानत आहेत.  केंद्र आणि राज्य सरकारने व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी सर्वत्र आॅनलाइन योजना आणली आहे. उद्योग क्षेत्रातदेखील आॅनलाइन योजना सुरू झाली असली तरी एमआयडीसीची वेबसाइट ओपन होत नसल्याच्या उद्योजकांच्या तक्रारी आहेत. मात्र ठराविक धनाढ्य लोकांसाठी मात्र या वेबसाइट कशा ओपन होतात, असा आरोप केला जात आहे. सामान्य उद्योजकांना मागणी करूनही भूखंड मिळत नाहीत, तर धनाढ्य लोकांना मात्र त्यांच्या मागणीप्रमाणे भूखंड उपलब्ध केले जात असल्याचा आरोप केला करण्यात येत आहे.अर्जदाराकडून संशय व्यक्तभूखंड मागणीसाठी एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात अर्ज देण्यासाठी आलेल्या उद्योजकांना रिसेलचे (पुनर्विक्र ीचे) अथवा खासगी संस्थेतील (गंगामाई सोसायटी, सातपूर आणि अंबड) गाळे घेण्याचा सल्ला दिला जात आहे, असा सल्ला देण्याचा अधिकार आहे का? की दलाली केली जाते असाही संशय अर्जदारांनी व्यक्त केला आहे.गेल्या पाच वर्षांपासून भूखंड मिळावा म्हणून एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात अर्ज करीत आहे. एक-दोन वेळा अर्ज गहाळ झाला होता. चौकशी करण्यास गेलो असता पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले. वर्ष दोन वर्षे चकरा मारल्यानंतर आॅनलाइन अर्ज करण्यास सांगण्यात आले, पण मंडळाची वेबसाइट कधीच ओपन झालेली आढळली नाही. ९० टक्के वेबसाइट बंदच असते. माझ्या मागे गॉडफादर नसल्याने मला अद्याप भूखंड मिळालेला नाही. शिवाय खासगी सोसायटीत गाळा घ्या किंवा रिसेलचा (पुनर्विक्र ीचा) भूखंड घेण्याचा सल्ला संबंधित अधिकारी देत होते. दिंडोरी येथेही भूखंडाची मागणी केली होती, पण उपयोग झाला नाही.- एक त्रस्त उद्योजक

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक