शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने नाशिक जिल्हयात तिघांचा बळी

By श्याम बागुल | Updated: November 5, 2018 18:55 IST

नाशिक : स्वाती नक्षत्राच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्ह्यात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने तिघांचा बळी ...

ठळक मुद्देजनावरेही दगावली : शेतीपिकांचे नुकसान

नाशिक : स्वाती नक्षत्राच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्ह्यात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने तिघांचा बळी गेला असून, काही ठिकाणी जनावरेही दगावली आहेत. या पावसामुळे रब्बीच्या पिकांना काही प्रमाणात लाभ होणार असला तरी, शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी, सोयाबीन पिकाचे तसेच छाटणी केलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसा उकाडा वाढला असून, अधून मधून आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. हवामानातील या बदलामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होवून रविवारी दुपारनंतर विजेचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यातील बहुतांशी भागात हजेरी लावली. त्यात विज पडून नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथील महादेव सदगिर हा इसम जागीच ठार झाला तर देवळा तालुक्यातील माळवाडी येथे धोंडू सोनू बागुल यांच्या शेतात वीज पडून शेतातील चारा जळून खाक झाला. तालुक्यातीलच चिंचवे येथे पुंडलिक साबळे यांची म्हैस वीज पडून दगावली आहे. बागलाण तालुक्यातील द्याने येथे शेड नेटचे काम करणारा श्ािंटू श्यामदेव चौहाण (२९) हा इसम वीज पडून मरण पावला. चौहाण हा बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्यातील शिवंजला येथील रहिवाशी आहे. त्याच बरोबर दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे नाल्याला आलेल्या पुरात वामन सदाशिव बस्ते (५५) हे वाहून गेल्याच भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे. निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील त्र्यंबक एकनाथ गांगुर्डे यांच्या गट नंबर १०१ मध्ये वीज पडून गाय दगावली आहे.चौकट===चांदवड, देवळ्याला झोडपलेरविवारी अवकाळी पावसाने चांदवड, देवळा, मालेगाव तालुक्याला झोडपले. वीजेचा कडकडाट, वादळी वा-यासह जोरदार कोसळलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. त्याच बरोबर शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवघ्या काही तास कोसळलेल्या पावसात नाशिक ४, सिन्नर १, चांदवड ५८, देवळा ४१, येवला १५, नांदगाव ७, मालेगाव २२ व बागलाणला १ मिली मीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक