शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:11 IST

पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून पाटोदा परिसरात ढगाळ हवामान आहे. त्यात रब्बी पिकांना पोषक असलेली थंडी गायब झाल्याने कांदा ...

ठळक मुद्देथंडी गायब : हवामान बदलाचा फटका ; कांदा पिकावर मावा

पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून पाटोदा परिसरात ढगाळ हवामान आहे. त्यात रब्बी पिकांना पोषक असलेली थंडी गायब झाल्याने कांदा व कांदा रोपावर मावा, तुडतुडे व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर अळीचे अतिक्रमण वाढले आहे. रब्बीच्या पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी वर्गाला सकाळ-संध्याकाळ अशी दोन वेळेस औषधांची फवारणी करावी लागत आहे.ऐन पिके काढणीच्या सुमारास परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने खरीप हंगामातील पिकांची वाताहत झाली. या परतीच्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात लागवड केलेल्या कांदा पिकाचे व कांदा रोपे सडून गेल्यामुळे कांदा बियाणे व कांदा लागवडीसाठी एकरी पन्नास ते साठ हजार रुपयांचा खर्च वाया गेल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न मानता पुन्हा नव्या उमेदीने भांडवल उभे करून रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली तसेच चार ते पाच हजार रुपये किलोचे महागडे कांदा बियाणे घेऊन कांदा लागवड केली.मात्र गेल्या काही दिवसांपासून रात्री थंडी, पहाटे दवबिंदू तर दिवसभर ढगाळ हवामान, तर कधी कडक ऊन असे संमिश्र वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा, तुडतुडे तसेच करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणावर अळीचा वावर वाढला आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकर्‍यांना औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. असेच वातावरण अजून काही दिवस राहिले तर रब्बी हंगामही वाया जाण्याची व मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी