शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बाजारात भुसार मालाची आवक मंदावली; मक्याचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:12 IST

बाजारगप्पा : मक्याचे भाव क्विंटलमागे तब्बल १०० रुपयांनी उतरले असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.

- संजय दुनबळे ( नाशिक )

कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकमध्ये मालाचा उठाव कमी झाल्याने मागील काही दिवसांपासून तेजीत असलेले मक्याचे भाव क्विंटलमागे तब्बल १०० रुपयांनी उतरले असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. विशेषत: ज्या व्यापाऱ्यांनी यापूर्वी अधिक भावाने मका खरेदी केला आहे, त्यांनाही फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली आहे. लासलगावी मक्याचे भाव उतरले असले तरी सोयाबीन मात्र तेजीत असून, ३२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असलेले सोयाबीनचे भाव ३४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. 

लासलगाव बाजार समितीत मक्याचे भाव १५०० ते १५२५ पर्यंत असल्याचे दिसून आले. मक्याची आयात होणार असल्याची अफवा पसरल्याने व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली असल्याची चर्चा बाजार वर्तुळात होत आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यातून मुंबई, गुजरात या भागात मका पाठविली जाते. येथे मध्य प्रदेशातून मका येऊ लागली असून, त्याचा भाव जिल्ह्यातील भावापेक्षा कमी असल्याने नाशिक जिल्ह्यातील मालाचा उठाव कमी झाला असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. नाशिकमधून जाणाऱ्या मक्याला १८०० रुपयांपर्यंत, तर मध्य प्रदेशातून येणाऱ्या मक्याला १७०० रुपयांत पोहोच होऊ लागल्याने तिकडील मक्याला पसंती दिली जात आहे. त्याचा नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनाही फटका बसला आहे. ज्या व्यापाऱ्यांनी यापूर्वी १६७० ते १६८० रुपये प्रतिक्विं टल दराने मका खरेदी केली आहे, त्यांना आता मका विक्री करणे कठीण होते की काय, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. लासलगावी गत सप्ताहात मक्याची १७,४७५ क्विंटल आवक झाली. भाव साधारणत: १३८० ते १७२४ रुपये प्रतिक्विं टलपर्यंत होते, तर गुरुवारी मक्याचे भाव १५०० ते १५२५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. 

मध्य प्रदेशातून होणारी सोयाबीनची आवक कमी झाल्याने सोयाबीनच्या भावात तेजी आली असून, क्विंटलमागे तब्बल २०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ३२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असलेले सोयाबीन ३४०० रुपयांपर्यंत गेले आहेत. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक अगदी तुरळक स्वरूपात होत आहे.बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून स्थानिक व्यापाऱ्यांकडे थोडीफार बाजरीची आवक सुरू असल्याचे दिसून आले. गहू आवकही कमी असून, गव्हाला लासलगावी २५८२ रुपये, तर विंचूरला २३०० रुपये प्रतिक्विंटल भाव होते. मालेगाव, नांदगाव या बाजार समित्यांमध्येही मक्यासह सर्वच भुसार मालाची आवक कमी झाली आहे. मालेगावी मक्याचे भाव १०० रुपयांनी उतरले आहेत. जुन्या हरभऱ्याची आवक कमी असून, नवीन हरभऱ्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. गत सप्ताहात लासलगावी हरभऱ्याला ३००० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव होते. हरभऱ्याचे भाव आणखी वाढतील अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी