शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 18:24 IST

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नाशिक शहरात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवास प्रारंभ झाला. डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर गुरुवारी (दि.२३) उद्घाटन या प्रदशर्नाचे उद्घाटन झाले. तत्पुर्वी सेवेकऱ्यांनी शहरातून पारंपारिक वेशभूषा करून बैलगाडीसह हातात ध्वज घेऊन शोभायात्रेत सहभाह घेतला होता.

नाशिक : नव्या युगाचे नवे आव्हान पेलण्यासाठी तरुण शेतकऱ्यांना कृषिविषयक तंत्रशुद्ध ज्ञानाची शिदोरी देण्याची गरज असून, देशातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर गुरुवारी (दि.२३) उद्घाटन झाले, त्याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी गोदावरी नदी काठावर गंगापूजन करून मालेगाव स्टॅण्ड, घारपुरे घाट, गंगापूररोडमार्गे शोभायात्रा काढून सेवेकरी डोंगरे मैदानावर दाखल झाल्यानंतर जानोरी येथील शेतकरी सुनील तिडके यांच्या हस्ते सपत्निक मातीपूजन करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. सुधीर तांबे, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, गणपत गायकवाड, केव्हीएन नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, अर्थतज्ज्ञ नामदेव जाधव, नगरसेवक वत्सला खैरे, स्वाती भामरे, नितीन मोरे, चंद्र्रकांत मोरे, आबासाहेब मोरे आदी उपस्थित होते.  

गुरुमाउली अण्णासाहेब मोरे म्हणाले, कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयी, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती व मार्गदर्शनासोबत कृषीतील ऋषी संस्कृतीविषयीही ज्ञानाची शिदोरी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून शेतकरी आत्महत्या कमी करणे शक्य असल्याचे सांगितले. डॉ. सुधीर तांबे यांनी श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने कृषी व अध्यात्माचे धडे सर्वसामान्य तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवून आजच्या युवा, तरुण पिढीला योग्य दिशा दिल्याचे मत व्यक्त केले. विभागीय कृषी संचालक संजीव पडवळ, आत्मा केंद्राचे हेमंत काळे, कैलास शिरसाठ, प्रतिभा भदाने, मधुकर जाधव यांच्यासह शेतकरी व सेवेकरी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदे