ओतूर : गाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दररोज पसरत असल्याने काही रुग्ण दगावले, तर बाधितींची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी व लस घेऊन नियमांचे पालन करून घरातच राहावे, असे आवाहन ओतूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले आहे.ओतूरला आतापर्यंत २,४६७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. शुक्रवारी (दि.२३) उपकेंद्र आंठबे येथे जि.प. शाळेत लसीकरणाचे उद्घाटन सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत केले. यावेळी लस घेण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी १०३ ग्रामस्थांनी लसीचा लाभ घेतला.याप्रसंगी वैद्यकीय आधिकारी डॉ. प्रशांत बहिरम, डॉ. किशोर देशमुख, डॉ. दीपक देवरे, तसेच आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आंठबे येथे लसीकरणाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 18:40 IST
ओतूर : गाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दररोज पसरत असल्याने काही रुग्ण दगावले, तर बाधितींची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी विशेष ...
आंठबे येथे लसीकरणाचे उद्घाटन
ठळक मुद्देओतूर परिसरात कोरोना रुग्णांंमध्ये वाढ