मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. मविप्र संचालक हेमंत वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, संजय ढोले, विलास मठे, उपप्राचार्य राजेंद्र पवार, डॉ. डी एम जाधव, समन्वयक डॉ मनोहर झटे, सहसमन्वयक प्रा हर्षल दाभणे, डॉ. अमोल काटेगावकर उपस्थित होते. या परिषदेत रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पदार्थर् विज्ञान आणि औषध निर्माण शास्त्र या विषयाच्या अनुषंगाने उपयुक्त मार्गदर्शन हे तज्ज्ञ व्याख्यानातून होणार असल्याचे डॉ. तुषार शेवळे यांनी सांगितले. या राष्ट्रीय परिषदेमध्ये रसायनशास्त्र आणि पदार्थ विज्ञान या विषयातील उद्योन्मुख नवीन प्रवाह या मुख्य विषयाच्या अनुषंगाने तज्ज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे हेमंत वाजे यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी महाविद्यालयात वर्षभर प्रत्येक विभागांतर्गत विविध उपक्र म आणि कार्यक्र म होत असल्याचे सांगितले. सदर परिषदेत रसायनशास्त्र, नॅनोविज्ञान , कार्बनयुक्त रसायनशास्त्र, ग्रीन केमिस्ट्री, फायबर आॅप्टिक, थिन फिल्म तंत्रज्ञान या विषयांवर दोन दिवसांमध्ये विचारमंथन होणार आहे. सूत्रसंचालन व परिचय प्रा. प्रतीक्षा गरुड यांनी करुन दिला. डॉ. मनोहर झटे यांनी आभार मानले.
सिन्नर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 17:39 IST