शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा तालुक्यात अवैध मद्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 18:36 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पेठ, करंजाळी येथील सीमा तपासणी नाक्याच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला असता, सुरगाणा तालुक्यातील निंबारपाडा-राशागावरोड मार्गे येत असलेली तवेरा (क्रमांक जीजे १९, एम ८८४७) अडवून तपासणी केली असता, त्यात दमण निर्मित विदेशी

ठळक मुद्देदहा लाखांचा माल : आरोपी मात्र चकमा देऊन फरारअधिका-यांनी दोन्ही वाहने जप्त केली

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात दीव, दमण निर्मित विदेशी मद्याची चोरटी वाहतूक सुरूच असून, त्याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रयत्न करीत असतानाही मद्य तस्कर मात्र त्यातूनही सहीसलामत सुटका करून घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरगाणा तालुक्यात सापळा रचून विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले, परंतु मद्य तस्कर फरार झाला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पेठ, करंजाळी येथील सीमा तपासणी नाक्याच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला असता, सुरगाणा तालुक्यातील निंबारपाडा-राशागावरोड मार्गे येत असलेली तवेरा (क्रमांक जीजे १९, एम ८८४७) अडवून तपासणी केली असता, त्यात दमण निर्मित विदेशी मद्याचा मोठ्या प्रमाणात साठा सापडला. पथकाने कारचालक अश्विन केसू गांगोडा यास ताब्यात घेतले. त्याचदरम्यान, उंबरठाण-धरमपूररोडवर उंबरठाण शिवारातून संशयास्पद येणारी स्विफ्ट (क्रमांक जी. जे. ०५, सीएस ९६०८) कार अडविली असता त्यातही मोठ्या प्रमाणात मद्य सापडले. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांची कारवाई सुरू असतानाच कारचालक मात्र चकमा देऊन फरार झाला. अधिका-यांनी दोन्ही वाहने जप्त केली असून, जॉन मार्टिन व्हिस्कीचे २८ बॉक्स, इम्पिरीयल ब्लूचे पाच बॉक्स, हायवर्ड बिअरचे १२ बॉक्स असा सुमारे दहा लाखांचा माल ताब्यात घेतला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बी. एन. भुतकर, निरीक्षक एन. एम. खांदवे, दुय्यम निरीक्षक सुरेंद्र बनसोडे, हवालदार लोकेश गायकवाड, संजय सोनवणे, महेश खामकर, महेश सातपुते, सुनीता महाजन यांनी पार पाडली.(फोटो २२ एक्साईज)

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक