शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

३०० सरपंच गिरविणार शाश्वत विकासाचे धडे

By suyog.joshi | Updated: March 2, 2024 20:02 IST

कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत.

सुयोग जोशी, नाशिक: स्थानिक स्तरावर शाश्वत विकास कशा पद्धतीने साधता येऊ शकतो, यासह स्थानिक नेतृत्व विकसित करतांना त्यांच्या माध्यमातून बदल घडविण्याचा ध्यास तसेच कौशल्ये, शिक्षण, आणि स्वच्छता अशा विविध संकल्पनांची माहिती जिल्ह्यातील सुमारे ३०० सरपंच गिरविणार आहे. निमित्त आहे, द मिशन क्वालिटी सिटी, सरपंच संवाद आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ( ५) सरपंच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण व गुणवत्ता विकास सत्रांचे आयोजित केले आहे अशी माहिती क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे कार्यकारणी सदस्य जितेंद्र ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हाॅटेल गेट वे येथे मंगळवारी (दि.५) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात ही सरपंच संवाद होणार आहे. कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ठक्कर म्हणाले की, संस्थेतर्फे भारतातील पंचायत राज व्यवस्थेला पाठबळ देते व सक्षम करण्यावर भर दिला जातो आहे. या सत्रांच्या माध्यमातून सरपंचांना त्यांच्यासाठी उपयुक्त ज्ञान प्रदान करतांना ख-या अर्थाने सरपंच संवाद घडविला जाणार आहे. मिशन क्वालिटी सिटी नाशिकच्या सहकार्याने राबवत असलेल्या या उपक्रमातून नाशिक ग्रामीणमधील लोकांच्या जीवनावर परिणामकारक बदल घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस हेमंत राठी, क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील उपस्थित होते.शिक्षण अन स्वच्छेतवर भर-मित्तल

कार्यशाळेतून कौशल्ये, शिक्षण, आणि स्वच्छता अशा विविध संकल्पना निश्चित करण्यात आलेल्या आहेत. विविध सत्रांच्या माध्यमातून सहभागी सरपंचांना ज्ञान व कौशल्ये प्राप्त होतील. ज्यांचा उपयोग करुन खेड्याचा शाश्वत विकास सध्याच्या दृष्टीने ते धेय्य निश्चिती व पुढील कार्यपध्दती ठरवू शकतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. या उपक्रमात चळवळीसोबत ४८ संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. या संयुक्त उपक्रमातून विकसीत भारत मोहिमेसाठी स्थानिक स्तरावर सक्षमीकरण व नेतृत्व विकासावर भर दिला जात असल्याचे क्युसीआयचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले.

टॅग्स :sarpanchसरपंच