शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! ३६५ दिवसांत राज्यात तब्बल १५९ बिबटे मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 16:38 IST

राज्यात बिबट्याची संख्या काही जिल्ह्यांमध्ये वाढत असल्याचे वारंवार बोलले जाते; मात्र बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून ही चिंताजनक बाब ...

राज्यात बिबट्याची संख्या काही जिल्ह्यांमध्ये वाढत असल्याचे वारंवार बोलले जाते; मात्र बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. २०२१ साली राज्यात १५९ पैकी ८४ बिबटे नैसर्गिक कारणांनी मृत्युमुखी पडले आहेत. यावरुन बिबट्यांना योग्य पुरेशे सुरक्षित खाद्यदेखील उपलब्ध होत नसून बिबट्यांना संसर्गजन्य आजारांची लागण होऊनदेखील मृत्यू ओढवत आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनांनी राज्यात २९ बिबट्यांना चिरडून टाकले तर नाशिकच्या लहवितजवळील रेल्वे रुळावर एक बिबट्या चिरडून ठार झाला. वर्षभरात रेल्वेच्या लोहमार्गावर केवळ हाच एक अपघात घडला आहे. उर्वरित कुठल्याही जिल्ह्यात रेल्वेखाली चिरडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची नोंद वनखात्याच्या दप्तरी नाही.

वर्षभरात औरंगाबादमध्ये चार बिबट्यांची शिकार झाली आहे. रस्ते अपघात, किंवा विहीर, तलाव किंवा नदीमध्ये बुडून मृत्यमुखी पडलेल्या बिबट्यांच्या संख्येपेक्षा नैसर्गिक मृत्यू ओढावलेला आकडा मोठा आहे. संपूर्ण राज्यात ८४ बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ३७ बिबटे नाशिकमध्ये नैसर्गिक कारणाने मृत्युमुखी पडले आहेत. तसेच राज्यात विविध कारणास्तव बिबटे मृत्युमुखी पडलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिक अग्रस्थानी आहे. नाशिकमध्ये ६६ तर पुण्यात ३३ बिबट्यांचा गेल्या वर्षभरात मृत्यू झाला आहे.

बिबट्यांचा मृत्यू व कारणे अशी....

नैसर्गिक - ८४

वाहनांच्या धडकेत- २९

पाण्यात बुडून- ३४

शिकार-४

वीजेचा शॉक- २

अन्य कारणाने- ५

रेल्वेच्या धडकेत- १

शिकारीवर नियंत्रण

बिबट्यांच्या शिकारीवर नियंत्रण मिळविण्यास राज्यभरात वनखात्याला काही प्रमाणात यश आले आहे. २०२०च्या तुलनेत २०२१साली केवळ ४बिबट्यांची शिकार झाल्याची नोंद आहे. औरंगाबाद वनवृत्तामध्ये ही शिकार करण्यात आली आहे. २०२०साली राज्यात १७ तर २०१९साली नऊ बिबट्यांचा शिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने बळी घेतला होता.

 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक